कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. मास्क रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे. कारण मास्कशिवाय घराबाहेर पडायची सगळ्यांनाच भीती वाटते. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यास मास्क न लावल्याने लागण होण्याची शक्यता जास्त असते. अश्यात समजा तुम्ही मास्क लावायला विसरला तर काय होईल याचा तुम्ही विचार केलाय का? फार फार तर तुम्ही जर बाहेर जाताना मास्क विसरलात तर आपल्या खिशातून रुमाल काढून तोंडाला लावाल किंवा नवीन मास्क विकत घ्याल. सध्या सोशल मीडियावर एका माणसाचा फोटो व्हायरल होत आहे.
तुम्ही पाहू शकता फोटोमधील ही व्यक्ती मास्क लावायला विसरली आहे. म्हणून कोरोनाला घाबरून चक्क आपला कुर्ता तोंडावर ओढून घेतला आहे. सुरूवातीला पुतळा असल्याप्रमाणे हा फोटो दिसतो. नीट पाहिल्यानंतर या माणसानं कुर्ता तोंडावर ओढून घेतल्याचं समजतं. आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन दिलं आहे की, ''जेव्हा कॅशिअरकडून मास्क न घातल्यास पैसै मिळणार नाही असं सांगितलं जातं. ''
हा मजेशीर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोला हजारापेक्षा जास्त लाईक्स आणि ८२ पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. या फोटोतून मास्क घालायला विसरलेल्या या माणसाची फजीती झालेली दिसून येत आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सध्या मास्क वापरणं खूप गरजेचं झालं आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या दोन कोटींपेक्षा जास्त आहे.
हे पण वाचा-
जिद्दीला सलाम! UPSC त पाच वेळा नापास झाला; अन् सहाव्यांदा यशस्वी होऊन IAS अधिकारी बनला