सध्या जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियात लोक चांगलेच अॅक्टिव झालेत. अनेकजण त्यांचे ड्रोनचे काही खास व्हिडीओ टाकत आहेत. कुणी ड्रोनने टॉयलेट पेपर पाठवतंय तर कुणी ड्रोनच्या माध्यमातून मुली पटवतंय. पण आता ड्रोनचा एक असा व्हिडीओ समोर आला जो पाहून सगळ्यांना नाही पण काही लोकांना फारच ईर्ष्या वाटणार आहे.
ही ऑस्ट्रेलियातील घटना असून झालं असं की, एका मित्राने त्याच्या इतर मित्रांना ड्रोनच्या माध्यमातून चक्क ड्रिंक्स पाठवले. त्याने मित्रांना अल्कोहोलचे दोन पेग पाठवले.
ऑस्ट्रेलियातील एडलेडमधील ही घटना आहे. Joe Mignone नावाच्या तरूणाने हा कारनामा केलाय. त्याने त्याच्या जॉनी वॉकरच्या बॉटलमधील दोन पेग स्कॉच शेजारी राहणाऱ्या मित्रांसोबत शेअर केली. आश्चर्याची बाब म्हणजे Joe ने हे करत असताना एक थेंबही दारू ग्लासमधून खाली पडू दिली नाही.
सोशल डिस्टन्स कायम ठेवून त्याने हे काम केलं. आता ही स्टोरी पाहून तुम्हीही मद्यसेवन करा किंवा इतरांसोबत मद्य शेअर करा असं आम्हाला अजिबात सुचवायचं नाही. आम्ही हे दाखवतोय की, लोक लॉकडाऊन किती क्रिएटीव्ह झाले आहेत.