प्रसिद्ध सर्व्हायव्हल इंस्ट्रक्टर असलेल्या बेअर ग्रिल्सचा अंगावर शहारे आणणारा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा डिस्कवरी चॅनेलवरचा शो आपल्या सर्वांनाच माहित आहे. जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेअर ग्रिल्सचा हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय आहे. दरम्यान, बेअर ग्रिल्सच्या या शोमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजंगल सफारी करताना दिणार आहेत. खुद्द बेअर ग्रिल्स यानेच ट्विट करून ही माहिती दिली आहे. मॅन व्हर्सेस वाईल्डचा हा विशेष भाग 12 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
बेयर ग्रिल्स आणि मोदी यांचा हा खास एपिसोड उत्तराखंडच्या 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क'मध्ये शूट करण्यात आला आहे. आता बेयर ग्रिल्स म्हणजे, भन्नाट व्यक्तीमत्त्व, जो जंगलामध्ये कसाही भटकतो, काहीही खातो आणि कुठेही राहतो. त्याच्यासोबत मोदींची ही जंगल सफारी पाहणं सर्वांसाठीच औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, कार्यक्रमाचा टिझर बेअर ग्रिल्स याने प्रसारित केला असून, त्यात तो म्हणतो. 180 देशातील लोकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची कधी समोर न आलेली बाजू पाहण्याची संधी मिळणार आहे. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी नरेंद्र मोदी हे भारतातील जंगलांमध्ये सफारी करताना दिसणार आहेत. डिस्कव्हरी चॅनेलवर हा विशेष कार्यक्रम पाहा. 12 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता.
या कार्यक्रमाचा टिझर बेअर ग्रिल्सने ट्विट करताच, नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे. एवढचं नव्हेतर मोदी आणि बेअर ग्रिल्सच्या या जंगल सफारीचा टिझर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मीम्सचा पाऊसच पाडला आहे.
अशा होत्या नेटकऱ्यांच्या रिअॅक्शन्स :