Stunt Video : सोशल मीडियावर नेहमीच स्टंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काहींमध्ये स्टंट यशस्वी ठरतात तर काहींमध्ये स्टंट अपयशी ठरतात. असाच एक अपयशी स्टंट सध्या चर्चेत आहे. या स्टंटची चर्चा होतीये कारण यात स्टंटमॅनने डोक्यात हेल्मेट घातला होता. जर त्याने डोक्यात घातला नसता तर त्याचं काय झालं असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. हा व्हिडीओ यासाठीही खास आहे की, तुम्हाला हेही कळतं की, हेल्मेट वापरणं किती महत्वाचं आहे.
हा व्हायरल व्हिडीओ IPS अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की, 'हेल्मेटचं महत्व शिका फक्त ६ सेकंदात'. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती रस्त्यावरून बाइकने जात आहे. अशात तो अचानक टर्न घेतो.
व्हिडीओ पाहिल्यावर असं दिसतं की, व्यक्ती बाइकने स्टंट करत होता. या नादात त्याचा बॅलन्स बिघडतो आणि बाइकवर तोंडावर पडतो. ज्याप्रकारे तो रस्त्यावर पडतो ते बघून हेच वाटतं की, नशीब त्याच्या डोक्यात हेल्मेट होतं. नाही तर तो गंभीर जखमी झाला असता.
त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्याने त्याला गंभीर इजा झाली नाही. सुदैवाने तो लगेच उठला. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, जगभरात अपघातात किती लोकांचा जीव जातो भारतातही अपघाताने दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो अशात हेल्मेट किती महत्वाचा आहे हे हा व्हिडीओ शिकवतो.
हे पण वाचा :
आपल्यासोबत सावलीसारखा असणाऱ्या 'ह्या' मुलाला रतन टाटा देतात 'एवढा' पगार!