कुठे फिरायला गेलो की पर्यटनस्थळी असलेल्या पक्ष्यांना (Feeding birds), प्राण्यांना खायला (Feeding animals) घालायला आपल्याला खूप आवडतं. पण प्राणी किंवा पक्षी यांना खायला घालताना आपणही सावध राहायला हवं, नाहीतर काय होऊ शकतं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे.
माशांना (Fish video) खायला (Feeding fish) घालणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे (Fish attack on man). ज्या माशांना तो खायला घालत होता, त्याच माशाने तरुणाला पाण्यात खेचून घेतलं (Fish attack video). यात खरंतर या तरुणाचीच चूक. हा तरुण आपल्या तोंडाने या माशांना भरवत होता आणि माशांनी त्याच्यावरच हल्ला केला. धडकी भरवणारा हा असा व्हिडीओ आहे. पाहताच अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो.
resepmasakanidaman इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एका काचेच्या टँकमध्ये भलेमोठे मासे आहेत. तरुणाने आपल्या तोंडाच एक छोटा मासा धरला आहे आणि टँकमधील माशांना भरवण्याचा प्रयत्न करतो. जसं तो तोंड पाण्याजवळ नेतो, तसे मासेही त्याच्या तोंडाजवळ येतात. काही सेकंदातच एक मासा त्या तरुणाच्या तोंडावरच हल्ला करतो आणि तरुणाचा तोल ढासळतो. माशांना खायला भरवता भरवता तरुणही पाण्याच्या टँकमध्ये कोसळतो.