शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
2
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
3
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
4
लोकसभेचं गणित विधानसभेला जुळत नसल्याने महाविकास आघाडीला ४० जागांवर बसणार फटका?
5
गौतम गंभीर नाही! वरिष्ठ खेळाडूच भारताच्या पराभवाला जबाबदार; माजी खेळाडूंचे रोखठोक मत
6
J&K: अखनूरमध्ये सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; चकमकीत 3 दहशतवादी ठार
7
“आमच्या नादी लागू नका, मर्द होता मग पळून कशाला गेला?”; थोरातांचा सुजय विखेंना सवाल
8
बॉलिवूड निर्मात्याच्या लेकाचा बॅक टू बॅक हिट शो! Ranji Trophyत झळकावलं सलग दुसरं द्विशतक
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात राजकीय घडामोडींना वेग! उत्तर विधानसभेतील उमेदवारीवरुन माजी नगरसेवकांची नाराजी, वाड्यावर बैठक सुरु
10
"कधी न चालणारा माणूस..."; अमित ठाकरेंच्या दाव्यावर सदा सरवणकरांचा खोचक टोला
11
पुण्यात राष्ट्रवादीचे अस्तित्व पणाला; दोन्ही पवारांचे पक्ष किती जागांवर लढवतायत निवडणूक?
12
अभिनेत्रीचा पती होण्यापेक्षा नवाब मलिकांची मुलगी होणे केव्हाही चांगले; सना मलिकांनी स्वरा भास्करला सुनावले
13
वडील मजूर, बहिणीच्या लग्नानंतर कर्जाचा डोंगर; शाळेबाहेर भुईमुगाच्या शेंगा विकते विद्यार्थिनी
14
अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...
15
महिलांसाठी विशेष स्कीम, गुंतवणूकीवर मिळतोय जबरदस्त रिटर्न; पाहा संपूर्ण डिटेल 
16
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
17
"... अन्यथा बाहेर पडणं कठीण होईल," का धोनीनं तरुणांना दिला F&O पासून दूर राहण्याचा सल्ला?
18
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम, म्हणाले, "मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आणि विजयी होणार’’
19
क्रिकेटमध्ये नाही काडीचा रस; तरी या मुद्यावरून साक्षीनं घातली MS धोनीशी हुज्जत
20
'हे' आहेत देशातील सर्वात महागडे १० शेअर्स; किंमत आणि रिटर्न ऐकून अवाक् व्हाल; तुमच्याकडे आहे?

नशीब फळफळलं! आधी जिंकली ७६ लाखांची लॉटरी, आता पुन्हा लागला कोट्यवधींचा जॅकपॉट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:28 AM

'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड़ के', असं म्हटलं जातं आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एका नागरिकाला याचीच प्रचिती अनुभवायला मिळत आहे.

वॉशिंग्टन-

'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड़ के', असं म्हटलं जातं आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये एका नागरिकाला याचीच प्रचिती अनुभवायला मिळत आहे. कारण या व्यक्तीनं एकदा नव्हे, तर दोनवेळा लॉटरी जिंकली आहे. वर्जीनिया (Virginia) येथील सफोकचे (Suffolk) रहिवासी एल्विन कोपलँड (Alvin Copeland) यांनी १ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७.६ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. विशेष म्हणजे याआधी त्यांनी २००२ साली देखील ७६ लाख रुपयांची लॉटरी जिंकली होती. दोन वेळा एल्विन यांचं नशिब फळफळलं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. 

एल्विन कोपलँड यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सफोक येथील सेव्हन-इलेव्हन स्टोअरमधून Cash4Life चं तिकीट खरेदी केलं होतं. एल्विन आजवर ठराविक क्रमांकावरच बोली लावत आले आहेत आणि यावेळीही त्यांनी क्रमांक बदलला नाही. तिकीट खरेदी केल्यानंतर त्यांना कळालं की ४ डिसेंबर रोजीच्या ड्रॉ साठी त्यांनी बोली लावलेले ८-११-२५-४५-४८  हे पाच क्रमांक अचूक ठरले आहेत. यानंतर एल्विन यांचं आयुष्यच पालटलं. जवळपास ७.६ कोटी रुपयांची लॉटरी एल्विन यांनी जिंकली आहे. जिंकलेली रक्कम आपल्या कुटुंबीयांवर खर्च करणार असल्याचं एल्विन यांनी सांगितलं. 

"माझ्या नशीबानं मला दुसऱ्यांना साथ दिली. याआधी २००२ साली ७६ लाख रुपयांची लॉटरी मला लागली होती. त्यावेळी मी २ डॉलर खर्चून तिकीट खरेदी केलं होतं. पण त्यावेळी मला अंदाज नव्हता की माझं नशीब मला साथ देईल आणि मी लॉटरी जिंकेन", असं एल्विन म्हणाले. एकाच व्यक्तीनं दुसऱ्यांदा लॉटरी जिंकल्यानं अनेकजण हैराण देखील झाले आहेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल