सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. जगातील बातमी, माहिती आपल्यापर्यंत काही मिनिटात मिळते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, फोटोही व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर एक पत्ता चांगलाच व्हायरल झाला आहे.
ऑनलाईन वेबसाइटवरुन अनेकजण खरेदी करतात. यासाठी आपला पत्ता टाकणे महत्वाचे असते, अनेकवेळा पत्ता टाकणे चुकलेले असते. यासाठी डिलिव्हरी बॉय ग्राहकांना फोन करतात. भन्नाट पत्त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत हा पत्ता पाहून डिलिव्हरी एजंटही गोंधळले आहेत. फोटो एका पार्सलचा आहे, त्यावर लिहिलेला पत्ता चर्चेचा विषय बनला आहे.
हा फोटो ४ जानेवारी रोजीचा आहे. हा पत्ता जोधपूर मधील आहे, भिखाराम नावाच्या व्यक्तीने काही वस्तू मागवल्या होत्या. त्या व्यक्तीने आपला पत्ता भन्नाट लिहिला आहे. यात 'भिखाराम, हरिसिंह नगर. गिलाकोर गावाच्या १ किलोमीटर आधी उजव्या बाजूला त्यांच्या शेताच गेट आहे. ते लोखंडी गेट आहे. जवळच एक लहान गेट आहे आणि गेटजवळ काळे कापड लावले आहे. तिथे येऊन फोन करा. मी पुढे येईन.' असं या पत्त्यात लिहिले आहे.
हा फोटो निशांत नावाच्या ट्विटरवरुन ट्विट करण्यात आला आहे. 'डिलिव्हरी करणाऱ्याला त्याचा पत्ता मृत्यूपर्यंत लक्षात राहील.' हा फोटो चांगलाच व्हायरल होत असून लोक फोटो पाहून मजा घेत आहेत. असा पत्ता पहिल्यांदाच पाहिल्याचे लोक सांगत आहेत. काहींनी सांगितले की त्या व्यक्तीने पुस्तके कमी आणि घराचा पत्ता जास्त वाचला आहे. एकाने वापरकर्त्यांने कमेंटमध्ये म्हटले, डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीला हा पत्ता आयुष्यभर लक्षात राहील. काही लोकांनी पत्ता खरा नसून फोटोशॉप केलेला असल्याचे सांगितले.