नशेत असलेल्या महिलेने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाडीला आपली गाडी भिडवली. त्यानंतर या महिलेने मोठा गोंधळ घातला आणि शिवागाळ केली. हिमाचल प्रदेशच्या सताहर गावातील ही घटना आहे. महिलेने केलेल्या कारनाम्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना २४ मार्च रात्रीची आहे. कांगडा जिल्ह्यात राहणारी ही महिला सरकाघाटमध्ये आपल्या बहिणीकडे जात होती. नशेत ही महिला तिची कार चालवत होती आणि अशात तिने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला टक्कर दिली. त्यानंतर तिथे असलेल्या लोकांसोबत तिचा वाद सुरू झाला आणि मोठा गोंधळ झाला. महिलेने त्यांना शिवीगाळ केली. इतकेच नाही तर मर्डर करण्याची धमकीही दिली. सोबतच महिला म्हणाली की, मर्डर करून ती एका महिन्यात तरूंगातून बाहेर येईल. लोकांना तिचा हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिलेला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. यानंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिची मेडिकल टेस्ट केली गेली. त्यानंतर तिची ड्रंक अॅन्ड ड्राइव्हचं चालान फाडण्यात आलं. नंतर तिला नातेवाईकांकडे सोपवण्यात आलं. तसेच दुसऱ्या गाडीची नुकसान भरपाई देईल असंही महिला म्हणाली. त्यानंतर तिला सोडण्यात आलं.