तुम्ही कधी पिंपळाच्या झाडावर आंबा पाहिलाय? नाही ना? पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पिंपळाच्या झाडावर आंबा लागल्याचा दावा व्हिडीओसोबत केला जात आहे. हा व्हिडीओ जवळपास दीड मिनिटांचा आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडच्या ऋषीकेशमधील असल्याचा दावा आहे. ऋषीकेशच्या त्रिवेणी घाटाजवळ असलेल्या पोलीस चौकीजवळील पिंपळाच्या झाडावर तीन आंबे पाहिल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असा मजकूर व्हिडीओसोबत आहे.सोशल मीडियावर सध्या पिंपळाच्या झाडाच्या व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. व्हॉट्स ऍप, ट्विटर, फेसबुक सगळीकडेच हा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. पिंपळाच्या झाडाला आंबे हा चमत्कार असल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र सत्य वेगळं आहे. व्हायरल व्हिडीओसोबत केला जाणारा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं पडताळणीत समोर आलं.
VIDEO: काय सांगता, पिंपळाला लागलाय आंबा? व्हिडीओ तुफान व्हायरल झाला अन् भलताच प्रकार समोर आला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 1:01 PM