शरीरातील कोणत्याही अवयवयाला दुखापत झाली किंवा अवयव गमवावा लागला तर व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. आपण आयुष्यात काहीही करू शकणार नाही. कारण सामान्यांप्रमाणे आपलं शरीर काम करत नाही. अशी भावना निर्माण होते. पण काहीजण असे असतात जे हिंमत न हारता प्रयत्न करतात. परिस्थिती कशीही असो आपलं ध्येय साध्य करण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एक शूर चिमुरड्याबद्दल सांगणार आहोत.
मणिपूरच्या इम्फाळचा रहिवासी असलेल्या या मुलाचं नाव कुणाल श्रेष्ठ आहे. लहानपणापासून कुणालला एका पायाच्या साहाय्याने सगळी कामं करावी लागतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेला कुणाल फूटबॉल खेळण्यासह सायकल सुद्धा चालवतो. सोशल मीडियावर कुणालचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. कुबड्यांच्या साहाय्याने कुणाल फूटबॉल खेळतो.
वृत्तसंस्था एएनआयने याबाबत अधिक माहिती दिली आहे, कुणालने सांगितले की, ''मला फूटबॉल खेळायला सुरूवातीपासूनच आवडत होतं. सुरूवातीला मला पायाच्या समस्येमुळे नैराश्याचा सामना करावा लागला. पण काही काळात नंतर माझ्यात पुन्हा आत्मविश्वास येऊ लागला. मला माझ्या मित्रांनी मला या सगळ्यात खूप सहकार्य केलं.''
चमत्कार! 'हे' २ शब्द ऐकून शुद्धीवर आला तब्बल ६२ दिवसांपासून कोमात गेलेला १८ वर्षीय तरू
सोशल मीडियावर लोक या चिमुरड्याचे खूप कौतुक करत आहेत. अनेकांनी कुणालला रिअल हिरो म्हटलं आहे. एका युजरने म्हटले की, ''पुढे जाऊन तू कुटूंबाचे नाव नक्की मोठं करशील. तुझ्या निश्चयाला आणि आत्मविश्वासाला सलाम'' आतापर्यंत ४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाईक केलं असून ६३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अशक्य! फक्त १५ सेकंदात या चौघी मिळून झाल्या वाघ; विश्वास बसत नाही?, मग पाहा व्हिडीओ