पत्रिका नसताना लग्नात गेला MBA विद्यार्थी, पकडला गेला तर घासून घेतली भांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 09:45 AM2022-12-01T09:45:11+5:302022-12-01T09:45:32+5:30

MBA Student Without Invitation: झालं असं की, एक एमबीएचा विद्यार्थी इन्व्हिटेशन नसताना एका लग्नात गेला. यानंतर असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नसेल.

MBA student attended wedding party without invitation got punishment in Bhopal | पत्रिका नसताना लग्नात गेला MBA विद्यार्थी, पकडला गेला तर घासून घेतली भांडी

पत्रिका नसताना लग्नात गेला MBA विद्यार्थी, पकडला गेला तर घासून घेतली भांडी

Next

MBA Student Without Invitation: लग्नाच्या मंडपात किंवा लग्नात गोंधळाच्या अनेक घटना समोर येत असतात. सोशल मीडियावर या घटनांचे अनेक व्हिडीओही व्हायरल होत असतात. अशातच एक अशी घटना समोर आली आहे ज्याबाबत वाचून लोक हैराण झाले. झालं असं की, एक एमबीएचा विद्यार्थी इन्व्हिटेशन नसताना एका लग्नात गेला. यानंतर असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नसेल.

संशय आला आणि ओळख विचारली

ही घटना मध्य प्रदेशच्या भोपाळमधील आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करण्यात आल्यावर लोक यावर आक्षेप घेत आहेत की, अशाप्रकारे कुणाचा व्हिडीओ व्हायरल करणं योग्य नाही. एका लग्नात लग्न सुरू होतं. अशातच एका तरूणावर लग्नातील लोकांना संशय आला आणि त्याला ओळख विचारण्यात आली.

तरूण काही सांगू शकला नाही आणि तो पकडला गेला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने तो जबलपूरचा असल्याचं सांगितलं आणि भोपाळमध्ये तो एका प्रायव्हेट कॉलेजमधून एमबीएच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. जेव्हा समजलं की, तो पत्रिका नसताना आलाय तर त्याला लग्नातील भांडी घासण्यास सांगण्यात आली. त्याला शिक्षा म्हणून भांडी घासण्यास सांगण्यात आलं.

भांडी घासताना त्याच्या व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला. व्हिडीओ काढताना त्याला त्याचं नाव, शिक्षण, कुठे राहणारा आहे हेही विचारण्यात आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण काही लोकांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर काही लोकांनी हे योग्य केल्याचं म्हणत आहेत.
 

Web Title: MBA student attended wedding party without invitation got punishment in Bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.