काही महिन्यांपूर्वी 'शिवडे I Love You' असं लिहिलेले काही पोस्टर्स पुणे शहरात चर्चेत आले होते. असेच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात काही होर्डिंगची चांगलीच चर्चा रंगली आहे. कुणीतरी होर्डिंगच्या माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. यावर 'Amy, I Love You More' असं लिहिलं आहे. तसेच बोर्डवर एका इरिगेशन कंपनीचा लोगोही आहे. या फोटोवरून वेगवेगळे अंदाज बांधणं सुरू आहे. ही घटना आहे ओकलाहोमाच्य टुल्सा शहरातील. पण हा फोटो जगभरात चर्चेत आला आहे.
४१ चा जॉश आणि ५१ ची एमी....
अशी माहिती आहे की, शहरात ८ ठिकाणी असे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. काही लोकांनी अंदाज लावला की, एमी नाराज झाली असेल, त्यामुळे तिच्या प्रियकराने हे हार्डिंग्स लावले असतील. आता अनेक आठवड्यानंतर या होर्डिंग्सचं सत्य समोर आलं आहे. हे होर्डिंग लावणाऱ्या व्यक्तीचं नाव जॉश विल्सन असून तो ४१ वर्षांचा आहे. तर एमी विल्सन ही त्याची पत्नी असून ती ५१ वर्षांची आहे.
होर्डिंग्स लावण्याचं कारण
जॉशने सांगितले की, 'अनेक लोकांना असं एमी माझ्यावर नाराज आहे. पण असं काही नाहीये. विषय फक्त इतकाच आहे की, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे'. एमी आणि जॉश दोघे मिळून लिविंग वॉटर इरिगेशन कंपनी चालवातात. जॉशन सांगितले की, होर्डिंग लावण्यामागे पत्नीवरील प्रेम हे कारण तर आहेच. सोबतच आणखी एक मजेदार कारण आहे.
जॉशने जानेवारी महिन्यात एक वर्ष बिलबोर्ड कॅम्पेन चालवण्यासाठी होर्डिग्स बुक केले होते. यासाठी त्याला १२०० डॉलर प्रति महिना खर्च करावे लागणार आहेत. जॉशने सांगितले की, 'या होर्डिंग्सने माझ्या कंपनीला फार फायदा झाला नाही. त्यामुळे मी विचार केला की, कॅम्पेन बंद करावं. पण होर्डिंगची कंपनी म्हणाली की, एक वर्षाआधी हे कॅम्पेन बंद करता येणार नाही'.
जॉशने पुढे सांगितले की, 'माझे पैसे अडकलेले होते. माझा बिझनेस कोच क्ले क्लार्ककडे मी ही माझी अडचण शेअर केली. त्यानेच मला ही आयडिया दिली. क्लार्क मला म्हणाला की, तुझं तुझ्या बायकोवर इतकं प्रेम आहे. तू तिच्यासाठी या बिलबोर्ड काही का करत नाही. क्लार्कची ही आयडिया जॉशला पसंत पडला. आणि त्याने अशाप्रकारे होर्डिंग्स लावले.