डॉक्टर म्हटलं की, आपल्यासाठी देवच... रूग्णांचे आजार दूर करणारा आणि प्राण वाचविणारा माणूस म्हणजे, डॉक्टर. आज आम्ही अशाच एका हटके आणि क्लासी डॉक्टरबाबत तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर ही 31वर्षांची डॉक्टर Sarah Gray ऑस्ट्रेलियामध्ये राहते. सध्या ती एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. Sarah एक अशी डॉक्टर आहे, जिने सर्वात जास्त टॅटू गोंदवून घेतले आहेत.
16 वर्षांची असताना तिने गोंदवला होता सर्वात पहिला टॅटू
Sarah ने वयाच्या 16व्या वर्षा आपला पहिला टॅटू गोंदवून घेतला होता. आतापर्यंत तिने अनेक टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत.
दोन गोष्टींवरच आहे सर्वाधिक प्रेम
Sarah याबाबत सांगते की, तिचं दोन गोष्टिंवर सर्वाधिक प्रेम आहे. एक म्हणजे, आर्ट वर्क आणि दुसरी म्हणजे, तिचा डॉक्टरी पेशा.
'The Most Colourful Doctor' असं म्हणतात लोक
Sarah ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते त्याचं नाव Royal Adelaide Hospital असं आहे. येथे तिला 'The Most Colourful Doctor' म्हणून ओळखलं जातं.
टॅटू पार्लरही चालवते ही डॉक्टर
सारा आणि तिचे पती एक टॅटू पार्लर चालवतात. तिच्या नवऱ्याचं नाव मॅट असून तो फुल टाइम टॅटू आर्टिस्ट आहे.
टॅटूमुळे अनेकदा समस्यांचाही सामना करावा लागला
Dailymail ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये साराने सांगितले की, 'अनेकदा टॅटूमुळे मला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला. एकदा तर टॅटूमुळे मला एका रेस्टरंटमधून बाहेर काढण्यात आलं होतं.'
संपूर्ण शरीरावर आहेत टॅटू
Sarahच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळे टॅटू काढण्यात आले आहेत. फक्त तिचा चेहरा उरला आहे. तसेच सारा सांगते की, खासकरून तरूणाईचे निचार बदलत आहेत. हा एक प्रकारचा बॅरियर ब्रेक डाउन आहे. लोक बदल स्विकारून पुढे जात आहेत.' इन्स्टाग्रामवर Sarah चे 60 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. डॉक्टर असलेली सारा मॉडलिंगही करते.