कोरोनामुळे संपूर्ण जगच बदलून गेलं आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे लोकांच्या जीवनशैलीत मोठा बदल घडून आला आहे. विशेष म्हणजे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर ताण आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासत आहे तर कुठे रुग्णवाहिकांचा अभाव आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता रुग्णालय प्रशासनावर येणारा ताण वाढत आहे. अशा स्थितीत कर्तव्यावर हजर असणारे देवदूत गरजवंतांना मदतीचा हात देताना दिसून येत आहेत. आज अशीच एक घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
२०० पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात सोडले
केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील रहिवासी असलेले हरीश कुरूवाच्चेरी आणि माहील राथेश हे दोघे रिक्षा चालक आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या दोघांनी दोनशेपेक्षा जास्त कोरोना रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलं आहे. स्थानिक परिसरात रुग्णांच्या तुलनेत रुग्णवाहिकांची कमतरता असल्यामुळे या दोघांनीही रुग्णांना आणि आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.
हरिश यांनी सांगितले की, ''आम्ही रुग्णवाहिकेची सेवा देत नसलो तरी आम्ही लोकांना कोविड सेंटरपर्यंत पोहोचवत आहोत. कारण नार्लेश्वर परिसरात रुग्णवाहिकांची खूप कमतरता होती. आम्ही दोघांनीही दोनदा कोरोनाची चाचणी करून घेतली होती, सुदैवाने चाचणी निगेटिव्ह आली.'' नालेश्वर रुग्णालयाने या कामासाठी दोन रिक्षा चालकांची नेमणूक केली होती. जेव्हा रुग्णसंख्या वाढत गेली. तेव्हा या गैरसोय होऊ नये म्हणून रिक्षाचालकांची नेमणूक केल्याचे रुग्णालयातील प्रशासनाने सांगितले. ही सुविधा सुरू केल्याने रुग्णालायाचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट येणार? तज्ज्ञांनी सांगितलं यामागचं खरं कारण, जाणून घ्या
हरीश आणि माहिल राथेश हे कोरोना रुग्णांसााठी वाहतूक सेवा पूरवत असताना सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर, सॅनिटायजर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात. वृत्तसंस्था पीटीआयने या संबंधी अधिक माहिती दिली आहे. सोशल मीडियावर या दोघांची स्टोरी व्हायरल झाली असून सोशल मीडिया युजर्सनी या कोरोना योद्ध्यांना सलाम केले आहे. सलाम! .....म्हणून ६८ वर्षांच्या मराठमोळ्या आजी सायकलवर करताहेत २ हजार किमी प्रवास