मालवाहू वाहनांवर सामान्यपणे पुरूष हेच ड्रायव्हर बघायला मिळतात. पण महिलांनीही या क्षेत्रात स्वत:चं स्थान सिद्ध केलं आहे. आता महिला सुद्धा कमर्शिअल आणि हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग करू लागल्या आहेत. जपानमध्येही एक अशी तरुणी आहे जी ट्रक चालवते. Rino Sasaki असं या तरूणीचं नाव असून ती सोशल मीडियाच चांगलीच लोकप्रिय आहे. इंटरनेटवर तिचे अनेक चाहते आहेत आणि कारण अनेकांना हे यांचं कौतुक वाटतं की, इतकी सुंदर तरूणी ट्रक चालवते.
राइनोचे वडीलही ट्रक ड्रायव्हर आहेत. जेव्हा ती ७ वर्षांची होती तेव्हापासून तिचे वडील गंभीर आजारी आहेत. पण तरी सुद्धा ते काम करत होते. अशात राइनोला तिच्या वडिलांना एकटं सोडायचं नव्हतं. त्यामुळे ती वडिलांसोबत जाते.
घरापासून दूर रस्त्यावर बाप आणि मुलगी एकमेकांचा आधार ठरतात. राइनो जसजशी मोठी झाली, तशी तिने ट्रेडिशनल डान्स टिचर म्हणूनही काम सुरू केलं होतं. पण २१ वर्षांची झाल्यावर तिला ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्यावर तेव्हा तिने वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीच्या दिवसात राइनो ट्रकही चालवत असेल आणि डान्स टिचर म्हणूनही काम करत असे. पण आता तिने डान्सिंग करिअर पूर्णपणे सोडलं आहे. ती सांगते की, मला याचा काहीच पश्चाताप नाहीये. मला आता वडिलांसोबत जास्तीत जास्त वेळ रहायला मिळतं'.
दुसरीकडे सोशल मीडियात राइनोचे फोटो मोठ्या प्रमाणाच पसंत केले जातात. इन्स्टाग्रामवर तिचे २२.४ हजार फॉलोअर्स आहेत. तर फेसबुक आणि ट्विटरवरही ती चांगलीच लोकप्रिय आहे.
सोशल मीडियात लोक राइनोला जपानची सर्वात सुंदर ट्रक ड्रायव्हर म्हणतात. राइनोचं मत आहे की, तिला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे जपानमधील इतरही महिलांना ट्रक ड्रायव्हिंग करण्यासाठी प्रेरणा मिळेल. मी त्यामुळेच माझे फोटो सोशल मीडियात टाकत असते.
राइनो दरवर्षी २००,००० किलोमीटर ट्रक चालवते. ती जपानमध्ये फळ आणि भाज्या घेऊन जाणारा ट्रक चालवते. इतकेच नाही तर कधी ट्रकमध्ये काही बिघाड झाल्यास ती स्वत; दुरूस्तीही करते. तसेच ती ब्लॉगही लिहिते.