अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होतात ते पाहून नक्कीच तुम्हाला कौतुकास्पद वाटतं, सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओनं अनेक प्राणीप्रेमी संघटनाचे मन जिंकले आहे. या व्हिडीओत काही लोक रस्त्यावरील मुक्या आणि भुकेल्या जनावरांना दूध पाजताना दिसत आहेत. दावा केला जात आहे की, हे लोक एका मंदिराचे पुजारी अथवा स्वयंसेवक आहेत.
मंदिरात अनेकदा भाविकांकडून दुग्धअभिषेक घातला जातो, हजारो लीटर दूध अर्पण केले जाते, हे लोक ते दूध एकत्र करुन भूकेल्या जनावरांना पाजतात. हा कौतुकास्पद व्हिडीओ इंस्टाग्रामवर Amtmindia नावाच्या पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मंदिराच्या स्वयंसेवकांकडून जमा केलेले दूध रस्त्यावरील मुक्या जनावरांना पाजलं जातं. ज्यामुळे या प्राण्यांची भूक शांत होण्याचं निमित्त बनते, या व्हिडीओचं प्रचंड कौतुक होत आहे.
सोशल मीडियाचा वापर करुन अनेकदा वाईट गोष्टी शेअर केल्या जातात असं नाही, तर चांगल्या गोष्टीही शेअर केल्या जातात. लोकांनी हा व्हिडीओ पाहून या कार्याचं कौतुक केले आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकता की, कशारितीने मंदिरात जमा केलेले दूध दोन मोठ्या भांड्यात ओतलं जातं. त्यामुळे मंदिराबाहेर असणाऱ्या कुत्र्यांना ते दूध पिऊन आपली भूक भागवता येते.