दुधाची पिशवी कशी फोडावी याचे कोणी ट्रेनिंग देत नाही, परंतू आपण दररोज एक मोठी चूक करतोय. दुधाची पिशवी कापण्याची देखील एक कला, रीत आहे. आपण नेहमी दुधाची पिशवी कापताना कॉर्नर कापतो आणि पिशवीचा तुकडा वेगळा करतो. याच चुकीमुळे मोठे नुकसान होतेय. तुम्ही म्हणाल कसे...
आयएएस अधिकाऱ्याने एका महिलेने सांगितलेली ट्रिक ट्विट केली आहे. ही महिला बंगळुरुची आहे. यात मोठे नुकसान म्हणजे तो प्लॅस्टिकचा वेगळा झालेला छोटा तुकडा कधीही रिसायकल होत नाही आणि पृथ्वीवरील प्लॅस्टिकचा मोठा साठा जमा होऊ लागतो. तुम्ही दुधाची पिशवी कापण्याची पद्धत बदलली तर मोठा फायदा होऊ शकतो.
बंगळुरुतील अदम्य चेतना संस्थेच्या अध्यक्षा तेजस्वीनी अनंतकुमार यांनी ही ट्रिक सांगितली आहे. जर आपण प्लॅस्टिक पिशवीचा तुकडा वेगळा न करता दुधाची पिशवी फोडली तर एकट्या बंगळुरुमध्ये ५० लाख छोट्या प्लॅस्टिक तुकड्यांना कचऱ्यात जाण्यापासून रोखता येईल. कारण हे प्लॅस्टिकचे तुकडे रिसायकल होत नाहीत, असे त्या म्हणाल्या.
कशी कापायची...दुधाची पिशवी कशी कापायची याचा व्हिडीओ तेजस्वीनी अनंतकुमार यांनी पोस्ट केला आहे. यामध्ये दुधाची पिशवी कोनातून तिरपी न कापता तिला कोनामध्ये आडवा छेद द्यावा. यामुळे पिशवीचा तिरपा तुकडा वेगळा होणार नाही व दुधही आरामात पिशवीतून बाहेर येईल. प्लॅस्टिकचा तुकडा पिशवीलाच असल्याने तो रिसायकलला देखील जाईल. एक छोटासा बदल खूप काही बदल करून जाईल.
पहा हा व्हिडीओ....