राजस्थानातील भरतपूरमधील एका दुधवाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुधवाल्याच्या अस्वच्छ कारभाराचा व्हिडीओ सोशल मीडीयावर आता व्हायरल होत आहे. हा माणूस एका लांबट टाकीतून संपूर्ण शहराला दूध विकतो. जेव्हा दूध कमी पडतं तेव्हा दुकानातून दुधाची घेऊन दातांनी फोडून परत ते दूध टाकीत भरत आहे. ज्याप्रमाणे हा दुध विकणारा माणूस आपल्या दातांनी दूधाची पिशवी खोलून टाकीत भरत आहे. त्यामुळे दुधाच्या माध्यमातून कोरोनाचं संक्रमण शेकडो लोकांना होऊ शकतं.
ही घटना मथूरा गेट परिसरात मंगळवारी वीजेच्या खांबाजवळ घडली आहे. या ठिकाणीत एक दुधाचं दुकान तुम्हाला दिसून येईल. हा व्यक्ती आपल्या बाईकवरून घरोघरी जाऊन लोकाना दूध पुरवतो आणि जेव्हा टाकीतील दूध संपतं तेव्हा या दुकानातून दुधाच्या पिशव्या विकत घेऊन, दातांनी त्या पिशव्या फोडून दूध टाकीत ओततो. दुधवाल्याच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण शहराला किंमत मोजावी लागू शकते. संक्रमण पसरू शकतं. या घटनेमुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
ऐन कोरोनाच्या माहामारीत दुधवाल्याचं हे कृत्य समोर आल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. पोलीसांनी या प्रकरणाची तपासणी करून कायदेशीर कारवाई केली जाईल असे मथुरा गेट पोलीसांनी सांगितले आहे. अशा गैरप्रकारांवर या आधीही कारवाई करण्यात आली होती.
याआधी सुद्धा भरतपूरमधील एक फळविक्रेता आपल्या थुंकिचा वापर करून फळं पुसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला होता. याची दखल घेत पोलीसांनी या फळवाल्याचा पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो फळवाला फरार असल्यामुळे अजूनही त्याला शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
लॉकडाऊनमध्ये झाली 'लगीनघाई'; अन् मग बॉर्डरवरच उडवला लग्नाचा बार
बाबो... लॉकडाऊनमध्येही 'कडकनाथ' कोंबड्यांची लूट; सीसीटीव्हीत चोरटे झाले शूट