ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्य पदक (India won Silver at Tokyo) मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu) अनेकांची प्रेरणा बनली आहे. अनेकजण आता ऑलिम्पिकमध्ये मीराबाईसारखं यश प्राप्त करण्याची स्वप्न पाहु लागले आहेत. मात्र आता एका छोट्या मीरा बाई चानूनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ही चिमुकली व्हिडिओत मीराबाई चानू प्रमाणं वेटलिफ्टिंग करत जणू तिला अभिवादानच करत आहे.
या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की ही चिमुकली वेटलिफ्टिंग (Weightlifting Video) करत आहे, तर तिच्या मागे असणाऱ्या टीव्हीवर मीराबाई चानू ऑल्मिपिकमध्ये मेडल जिंकताना दिसतं आहे. जसं मीराबाई वेटलिफ्टिंग करते तशी ही चिमुकलीही वेट लिफ्टिंग करते. नंतर जिंकल्यावर ज्याप्रमाणे मीराबाई सर्वांना अभिवादन करते त्याचप्रमाणे ही मुलगीही अभिवादन करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारी ही चिमुकली वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम यांची मुलगी आहे. त्यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे. सतीश यांनी वेटलिफ्टिंगमध्ये याआधीच भारताची मान उंचावली आहे. त्यांनी मुलीचा हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरुन शेअर करत लिहिलं, ज्युनिअर @mirabai_chanu. याला प्रेरणा म्हणतात.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड होताच लोकांनी यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. एका यूजरनं म्हटलं, की खरंच मीराबाई चानू आपल्या देशाचा अभिमान आहे. तर दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की किती लहान मुलगी मीराबाई बनवण्याची स्वप्न पाहत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. इतरही अनेकांनी यावर कमेंट करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. तर, 60 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. मीराबाई चानूनंही व्हिडिओ शेअर करत त्याला सुंदर कॅप्शन दिलं. ती म्हणाली, सो क्युट लव्ह दिस.