Deadly Accident: ज्याला देव तारी, त्याला कोण मारी...ही म्हण अनेकवेळा खरी ठरताना आपण पाहिलंय. रस्ते अपघातांचे व्हिडिओ आपण दररोज सोशल मीडियावर पाहतो, ज्यामध्ये लोक मृत्यूच्या जबड्यातून बाहेर येतात. अशा लोकांचे नशीब खूप बलवान असते. आज आपण अशाच पाच घटनांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात लोकांनी यमराजालाही पळवून लावले आहे.
बसखाली येऊनही व्यक्ती वाचली
मुंबईतील पवई येथे झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बसखाली येऊनही एक व्यक्ती बचावली. तो रस्ता ओलांडत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात एक बस येते आणि त्या व्यक्तीच्या अंगावरुन जाते. बस पुढे गेल्यावर ती व्यक्ती उठून उभी राहते. सुदैवाने त्या व्यक्तीला कोणतीही दुखापत होत नाही.
धावती बाईक दुसऱ्या बाईकवर आदळली
हा व्हिडिओ बंगळुरुचा आहे. यामध्ये पाच वर्षीय चिमुकला आपल्या आई-वडिलांसोबत बाईकवरुन जात असतो. तेवढ्यात त्यांची बाईक समोरील बाईकवर आदळते आणि त्याचे आई-वडील खाली पडतात. तो चिमुकला तसाच बाईकवर राहतो आणि बाईक पुढे धावत जाते. सुदैवाने या अपघातात त्या चिमुकल्याला काहीच इजा होत नाही.
रस्ता ओलांडताना महिलेचा अपघात
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये महिला रस्ता ओलांडताना दिसत आहे. तेव्हाच दोन वाहनांची जोरदार टक्कर होते, पण ही महिला बचावते. ही महिला धावत्या वाहनांमधून रस्ता ओलांडत होती. तेव्हा पाठीमागून येणारी पांढऱ्या रंगाची कार तिला वाचवण्यासाठी थांबते आणि काळ्या रंगाची कार त्या पांढऱ्या कारवर धडकते. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
व्यक्ती दुचाकीवरुन पडून बसखाली आली
एक बाईकस्वार मृत्यूच्या जबड्यातून अशा प्रकारे बाहेर पडला की, पाहून तुम्हीही थक्क व्हाल. व्यक्ती आधी दुचाकीवरुन पडतो आणि नंतर बसच्या टायरखाली येतो. त्याचे मुंडके बसच्या चाकाखाली अडकतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावेळी ड्रायव्हरने योग्य वेळी बस थांबवली आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला. यानंतर त्या माणसाला उचलण्यासाठी लोक धावून आले. त्यावेळी त्याने हेल्मेट घातले होते.
पिकअप ट्रक आणि कारची धडक
या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पिकअप ट्रकच्या मागे बसलेला दिसत आहे. तेवढ्यात अचानक एक काळ्या रंगाची कार येऊन ट्रकला मागून जोरात धडकते. ही व्यक्ती उडून खाली पडते. त्याला काही काळ समजत नाही की, त्याला काय झालं. भरधाव कार त्या पिकअप ट्रकला खूप पुढे ढकलून देते. सुदैवाने त्यात जीवितहानी होत नाही.