एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना आहे थायलॅंडची. इथे मिस थायलॅंडसाठी फोटोशूट सुरू होतं. एका पूलावर जवळपास ३० मॉडल्स उभ्या राहून फोटोशूट करत होत्या. कॅमेरामन फोटो क्लिक करण्यासाठी रेडी होता. अशातच तो पूल पडला आणि सोबतच सर्व मॉडेल्स पुलासह पाण्यात पडल्या.
ही घटना थायलॅंडच्या चांग मईमध्ये घडली आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस होता. एका कॅफेमध्ये हे फोटोशूट सुरू होतं. पुलावर सर्व मॉडेल्स चढल्या पण पुलाला इतकं वजन पेलवलं नाही आणि पूल मॉडल्ससह खाली पडला.
यातील ३ मॉडेल्सना गंभीर जखमाही झाल्या तर काहींना खरचटलं. त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. कॅफेचा मालक Worapot Chatkanjana ने मॉडल्सच्या ट्रिटमेंटसाठी १२ लाख २४ हजार रूपयेही दिलेत. त्यांनी हेही सांगितलं की, पूल मजबूत होता. पण वजन जास्त झाल्याने पडला असेल.
Dr.Adisorn Suddee जे या इव्हेंटचे डायरेक्टर आहे त्यांनी सांगितले की, आधी हा इव्हेंट बॅंकॉकमध्ये होत होता. पण यावेळी हा इव्हेंट चांग मईमध्ये केला जात आहे.