PM Live News, Viral video: ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनेलचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टीव्ही न्यूज प्रेझेंटर लाइव्ह शो दरम्यान ब्रिटनच्या (इंग्लंड) नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस (British PM Liz Truss) यांना ओळखू शकले नाहीत आणि त्यामुळे काहीसा गोंधळ झाल्याचे दिसून आले. सोमवारी राणी एलिझाबेथ II यांच्या अंत्यसंस्कारासाठी वेस्टमिन्स्टर अँबे येथे लिझ ट्रस आल्या होत्या. या अंत्यसंस्काराला जगभरातील अनेक पंतप्रधान आणि राष्ट्रपती उपस्थित होते. त्यावेळी एका ऑस्ट्रेलियन चॅनलवरील न्यूज प्रेझेंटरकडून गल्लत झाल्याचे दिसून आले. (Trending on Social Media)
अंत्यसंस्काराच्या वेळी बाहेरच्या परिसरातील लाईव्ह प्रसारणादरम्यान, ऑस्ट्रेलियन टीव्ही अँकर ट्रेसी ग्रिमशॉ आणि पीटर ओव्हरटन यांना माहिती मिळाली की एका महत्त्वाच्या व्यक्तिच्या वाहनांचा ताफा येत आहे. वेस्टमिन्स्टर अॅबेजवळ हा ताफा आल्यानंतर त्यातून नक्की कोण उतरतंय हे ओळखण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होता. पण त्यांना ती व्यक्ती सुरूवातीला ओळखता आली नाही. ही ऑन-एअर चूक इंटरनेट युजर्सनी मात्र पटकन पकडली आणि व्हिडीओ व्हायरल झाला. पाहा तो व्हिडीओ-
नक्की काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमामे, लिझ ट्रस जेव्हा त्यांचे पती ह्यू ओ'लेरी यांच्यासोबत कारमधून उतरल्या त्यावेळी एक संवाद घडला.
ग्रिमशॉ (महिला अँकर)- हे (लोक) कोण आहेत?
ओव्हरटन (पुरूष अँकर)- हे ओळखणे जरा कठीणच आहे. कदाचित राजघराण्यातील कोणीतरी स्थानिक सदस्य आहेत. मला तरी त्यांची ओळख पटत नाहीये.
ग्रिमशॉ (कॅमेरा वरच्या अँगलला असताना)- दुर्दैवाने, आपण येथून साऱ्यांनाच पाहू शकत नाही. ते कदाचित स्थानिक स्तरावरील प्रतिष्ठित व्यक्ती असू शकतात. इथून हे पाहणे आणि सांगणे कठीण आहे.
ओव्हरटन- मला आत्ताच (स्टुडिओतून) सांगण्यात आले आहे की त्या ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान लिझ ट्रस आहेत. आपण त्यांना त्यांच्या कारमधून बाहेर पडताना आणि (अंत्यसंस्कारासाठी) आतल्या दिशेने जाताना पाहू शकतो.
या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला असून युजर्स याबाबत संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.