सोशल मीडियात अनेक घटना व्हायरल होत असतात आणि यातून वेगवेगळ्या घटना लोकांपर्यंत पोहोचतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका मोबाइलच्या दुकानात दुकानदार स्मार्टफोनची बॅटरी काढताच स्फोट झाला आहे. घटना इतकी धक्कादायक आहे की याचा व्हिडिओ पाहताच सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होत आहे.
तुम्हीही स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. स्मार्टफोन स्फोटाच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. लिथियम आयन बॅटरी दोषपूर्ण किंवा चुकीच्या हाताळणीमुळे स्फोट होतात. कधी-कधी यामुळे लोकांना मोठं नुकसान सहन करावं लागतं. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला आहे. जिथं मोबाईलच्या दुकानातच मोबाईलचा स्फोट झाला.
मध्य प्रदेशातील बालाघाट शहरालगत असलेल्या कनकी गावातील ही घटना आहे. जिथं मोबाईलच्या दुकानात ठेवलेला मोबाईल अचानक तरुणाच्या हातात फुटला. सुदैवाने या घटनेत तरुणाला कोणतीही दुखापत झाली नाही कारण मोबाईल पेट घेताच तरुणानं तो मोबाईल फेकून दिला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे. मोबाईलचा स्फोट झाल्यानं तेथे उपस्थित असलेले इतर लोकही घाबरले.
मिळालेल्या माहितीनुसार, कानकी गावात बंटी लिल्हारे यांचे मोबाईल शॉपी असून, ते मोबाईल रिपेअरिंगचे काम करतात, त्यांनी सांगितलं की, मोबाईलची बॅटरी बदलावी लागेल असा ग्राहकाचा फोन आला होता. बॅटरी काढयला गेलो आणि मोबाईलचा स्फोट झाला. मी लगेच मोबाईल फेकून दिला. त्यामुळे बचावलो.