पाळीव प्राणी पाळण्याची आवड प्रत्येकाला असते. अनेकजण कुत्रे पाळतात. काहीजण आपल्या कुत्र्यासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. फक्त कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यासाठी तब्बल ४ हजार किलोमीटरचा प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रवास करणारी एक करोडपती महिला आहे, ती सध्या चर्चेत आली आहे.
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ही मुलगी स्वतःच करोडपती झाली. लिन्से डोनोव्हन असे या मुलीचे नाव आहे. ती अमेरिकेची रहिवासी आहे. ती एक मॉडेल आहे आणि रिअल इस्टेट व्यवसायाशी देखील संबंधित आहे.
लिन्से तिच्या कुत्र्यासाठी 'लुई व्हिटॉन कंपनीचा कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा घेण्यासाठी गेली होती. त्याची किंमत सुमारे ८० हजार रुपये आहे.
अलीकडेच ती फ्लोरिडा येथून लॉस एंजेलिस येथे राहायला गेली होती, लिन्सीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.'मी फ्लोरिडाहून इथे आले आहे जेणेकरून मला माझ्या कुत्र्यासाठी लुई व्हिटॉन कंपनीची लीज विकत घेता येईल.' ज्या दुकानातून तिने हे सामान आणले त्या दुकानात तिने अडीच लाख रुपये खर्च केले, फक्त कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्यासाठी एवढा प्रवास केल्याचे तिने मुलाखतीत सांगितले.
जेव्हा लिन्स लॉस एंजेलिसमध्ये आली तेव्हा ती शहरातील सर्वात मोठ्या स्पा असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिली. तिच्या मैत्रिणीचे घर पाहिल्यानंतर तिने लॉस एंजेलिसमध्ये राहण्याचे ठरवले.१४ वर्षांची असताना तिने रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली, तिने वयाच्या १७ व्या वर्षी लाइव्ह स्ट्रीमिंग सुरू केले. यातून ती एका दिवसात सुमारे ५० हजार रुपये कमावते.