शैक्षणिक आयुष्यातील दहावी आणि बारावी हे दोन महत्वाचे टप्पे असतात. दहावीला चांगले गुणांनी उत्तीर्ण व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण एखादा विषय कच्चा असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर वारंवार परिक्षा देऊन पास होण्याची वेळ येते. असाच काहीसा प्रकार वयाची पन्नाशी ओलांडलेल्या आजोबांसोबत घडला आहे. अनेकदा नापास होऊनही कधीही हार न मानल्याचे फळ अखेर यांना मिळालं आहे.
हैदराबाद येथील मोहम्मद नुरूद्दीन हे ५१ वर्षीय आजोबा अखेर ३३ वर्षांनी १० वी ची परिक्षा पास झाले आहेत. गेल्या ३३ वर्षांपासून लागोपाठ दहावीत नापास होत असूनही त्यांनी कधीही हार मानली नाही. अखेर यावेळी त्यांना नशिबानं साथ दिली आणि राज्य सरकारने कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्व विदयार्थांना पास करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद नुरुद्दीन सुद्धा याच नशिबवान विद्यार्थ्यांपैकी एक होते.
वृत्तसंस्था एनएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की,'' १९८७ पासून मी लागोपाठ परिक्षा देत आहे. पण इंग्रजी विषयात मी सुरूवातीपासूनच कच्चा आहे. त्यासाठी मी सतत नापास होत आहे. पण यावेळी मी पास झालो कारण सरकारने कोविड 19 च्या माहामारीमुळे सुट दिली आहे.''
कोरोनाच्या संक्रमणाचा परिणाम बोर्डाच्या परिक्षांवरही झाला. परिणामी सीबीएसईसह अन्य राज्यांमध्ये परिक्षांचे निकाल उशीराने लागले. त्यानंतर कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता कोणालाही नापास केलं जाणार नाही असं सरकारकडून ठरवण्यात आलं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणातील या एक महत्वाचा ट्प्पा पार झाला.
बाबो! 'या' बकऱ्याच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर, किंमत वाचून व्हाल हैराण...
अरे बाप रे बाप! समुद्र किनाऱ्यावर अनोखा जीव पाहून हैराण झाले लोक, तुमची बोलतीही होईल बंद!