लंडन – इंग्लंडमध्ये एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू केवळ शरीरावरील एका तीळनं झाला आहे. काउंटी डरहम येथे राहणाऱ्या टॉम लिंटन(Tom Linton) या युवकाच्या शरीरावर सर्वात आधी छोटासा तीळसारखं चिन्ह बनलं. जे हळूहळू कॅन्सरमध्ये बदललं. ज्यामुळे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. २०२० मध्ये या युवकाला स्किन कॅन्सर असल्याचं कळालं. तो मेलेनोमा या आजाराने ग्रस्त होता ज्यामुळे वयाच्या २० व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.
कोरोना काळात आई वडिलांसोबत घालवले अखेरचे क्षण
कोरोना काळात झालेल्या या मृत्यूमुळे सगळ्यांनाच धक्का बसला. अखेरच्या क्षणी गर्लफ्रेंड आणि मित्रांनाही तो भेटू शकला नाही. मृत्यूच्या वेळी तो त्याच्या आईवडिलांसोबत होता. त्याने आई वडिलांकडून आश्वासन घेतले की, त्याला झालेल्या आजाराबद्दल जास्तीत जास्त लोकांना जागरुक करावं. जेणेकरुन माझ्यासारख्या संकटाचा सामना त्यांना करावा लागणार नाही असं शेवटच्या काळात आई वडिलांशी संवाद साधला.
२० वर्षीय युवकाचं कुटुंब आता लोकांना मेलेनोमा आजाराबद्दल जागरुक करण्याचं काम करते. द मिरर रिपोर्टनुसार, युवकाची आई म्हणाली की, अखेरच्या क्षणी मुलानं या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्याचं काम करावं असं आश्वासन घेतलं होतं. या युवकाच्या जुळ्या बहिणीही आहेत. तेदेखील आई वडिलांसह लोकांमध्ये जागरुकता निर्माण करतात.
युवकाची बहिण सांगते की, टॉम लिंटनसाठी तो काळ खूप कठीण होता. कारण त्या काळात लॉकडाऊन लागला होता. ज्यामुळे गर्लफ्रेंड आणि मित्रानांही भेटू शकला नाही. तो अखेरच्या दिवसांत कुटुंबासोबत आनंदी होता. टॉमच्या मृत्यूनंतर कुटुंबाला धक्का बसला. परंतु त्याला दिलेले वचन पाळण्यासाठी कुटुंब मेहनत घेत आहे. तर २०१९ च्या क्रिसमसपूर्वी टॉमची तब्येत खराब झाली. हळूहळू तिचं वजन कमी झालं. त्यानंतर त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. शरीरावर अनेक खूणा दिसून आल्या. डॉक्टरांनी स्कॅनसाठी पाठवला परंतु योग्य उत्तर न आल्याने त्याला Queen Elezabeth हॉस्पिटलला नेण्यात आले.
अचानक एकेदिवशी आईला आला कॉल
एकेदिवशी हॉस्पिटलमधून फोन आला की, त्यांचा मुलगा आता या जगात नाही तेव्हा आईला जबर धक्का बसला. मुलाच्या बॉडी स्कॅनमध्ये त्याला यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसात कर्करोग झाल्याचे दिसून आले. त्याच्या हातावर तीळ असल्याने त्याला हा कर्करोग झाल्याचं डॉक्टर म्हणाले अशी माहिती आईनं दिली.