कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसच्या सगळ्यात जास्त केसेस अमेरिकेत दिसून आल्या. कोरोनामुळे अनेकांना गंभीर प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. अजूनही कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. पण लसीकरण सुरू होण्याची सुरूवात होताच लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झालेली दिसून येत आहे. दरम्यान न्यूयॉर्कमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे.
एका महिलेने आपल्या नवजात बाळाला जन्म देताच प्राण गमावले आहेत. आपल्या बाळात कुशीत घेण्याचे सुख सुद्धा या माऊलीला मिळाले नाही. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील रहिवासी असलेल्या वनेसा कार्डेनस गोंजाजेस यांनी नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. ९ नोव्हेंबरला वनेसा यांनी आपल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळलं. असं म्हटलं जात आहे की, डिलिव्हरीदरम्यान बाळाची आई कोरोना पॉझिटिव्ह आली होती.
व्हिडीओ कॉलवर बाळाला पाहिलं
वेनिसाला कोरोनाचं संक्रमण झालंय हे कळताचं बाळाला वेगळं ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर वेनिसा जास्त दिवस जगू शकल्या नाहीत. मरण्याआधी त्यांनी आपल्या चिमुकल्याला व्हिडीओ कॉलवर पाहिले होते. nbclosangeles.com च्या रिपोर्टनुसार वेनिसा यांना कोरोना झाल्यानंतर बाळाला आईपासून लांब ठेवण्यात आलं होतं. आता या चिमुरडयाचे बाबा त्याची काळजी घेत आहेत.
वेनिसा यांना शेवटपर्यंत आशा होती की, त्या कोरोनातून ठीक होतील आणि आपल्या बाळाला कुशीत घेऊ शकतील. पण काळाच्या मनात काही वेगळंच होतं. वेनिसा यांना जीव गमवावा लागला आणि या माय लेकाची भेट होऊ शकली नाही. सोशल मीडियावर या घटनेबद्दल शोक व्यक्त केलं जात आहे. अनेकांना चिमुरड्यासाठी वाईट वाटत आहे. लय भारी! मराठमोळ्या जोडप्याचं अनोखं प्री-वेडिंग फोटोशूट; फुले दांपत्याबद्दल व्यक्त केला आदर