Wildlife फोटो अनेकदा मनाला स्पर्श करून जाणारे. तर अनेकदा असे असतात जे फक्त प्राण्यांनाच नाही तर माणसांनाही मोठा धडा देऊन जातात. आयुष्यातील संघर्ष, जीवन जगण्याची कला हे सगळं मुके प्राणीही आपल्याला शिकवतात. फक्त हे आपल्यावर अवलंबून असतं की आपण कोणाकडून काय शिकतो.सध्या Youtube वर व्हायरल होणारा एक व्हिडिओ (Wildlife Video) पाहून तुम्हालाही समजेल की जंगलात राहाणाऱ्या प्रत्येक प्राण्याला एक-एक दिवस कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो. हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःला वाचवावं लागतं. हे प्राणी स्वतःला आणि आपल्या जवळच्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी संघर्ष करत असतात. रामनगरच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्येही एक माकड आणि वाघ यांच्यात झाडावर लपंडावचा खेळ चालल्याचं पाहायला मिळालं, ज्यात वाघालाच हार मानावी लागली (Tiger Trying to Attack on Monkey).
व्हिडिओमध्ये दिसतं की झाडाच्या अगदी टोकावर बसलेल्या माकडाला पाहून वाघाचं मन बदलतं. वाघ कोणत्याही परिस्थितीत माकडाची शिकार करण्याचा निर्णय घेतो. याच नादात तो या झाडावरही चढतो, जिथे माकड फांदीवर बसून आराम करत असतं. आपला मृत्यू एक-एक पाऊल पुढे येत असल्याचं माकड पाहात राहातं. मात्र, इच्छा असूनही त्याला आपला जीव वाचवण्यासाठी काहीच करता येत नाही. तर वाघ फांद्याचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकत राहातो. पाहता पाहता वाघ माकडाच्या अगदी जवळ पोहोचतो. आता केवळ वाघाच्या एकाच उडीत माकडाची शिकार होणार असं दिसतं. मात्र म्हणतात ना की काही रस्ता दिसत नसला तरी शेवटपर्यंत प्रयत्न करायला हवा. माकडानेही हार मानली नाही आणि वाघाला आपल्याकडे आकर्षित करून जोरात उडी मारत मागे पळून गेलं. माकडावर हल्ला करण्याच्या नादात वाघही धाडकन खाली कोसळला (Tiger fell from tree).
हा व्हिडिओ एक सकारात्मक विचार देणाराही आहे. कारण जंगली प्राणी कधी कोणाची शिकार बनतील हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र, अशा परिस्थितीतही हार न मानता आपल्या आयुष्यासाठी संघर्ष करत राहाणारे हे प्राणी अनेकदा माणसांनाही धडा देऊन जातात. Youtube च्या Wild Dog Botsie चॅनलवर हा व्हिडिओ पोस्ट केला गेला आहे. आतापर्यंत 2 कोटीहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.