संपूर्ण देशभरात १४ जानेवारीला मकरसंक्रांतीचा (Makar Sankranti) सण अतिशय आनंदात साजरा केला गेला. संक्रांतीच्या दिवशी गुजरात आणि राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये पतंग उडवण्याची परंपरा आहे. मात्र, पतंग उडवण्याचा आनंद फक्त माणसांनेच नाही, तर माकडांनेही तितक्याच उत्साहाने घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडिओ (Video of Monkey Flying Kite) चांगलाच व्हायरल होत आहे. यात हे माकड पतंग उडवताना दिसत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक माकड छतावरील टाकीवर बसलं आहे आणि हातात मांजा पकडून पतंग उडवत आहे. व्हिडिओमध्ये माकड मांजा ओढून आरामात पतंग उडवताना दिसतं. ते पतंग उडवण्याची मजा घेत आहे. आकाशात अनेक पतंग उडताना व्हिडिओमध्ये दिसतात. हे पाहून माकडानेही पतंग उडवायला सुरुवात केली. नंतर त्याने पतंग आपल्याकडे खेचली आणि ती फाडून टाकली.
हा व्हिडिओ ट्विटरवर @anilsaini2004 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिण्यात आलं, मकर संक्रांतीच्या निमित्नाने जयपूरमध्ये पतंग उडवण्याची पद्धत अशी आहे, की इथे माकडेही पतंग उडवतात. या व्हिडिओवर नेटकरी निरनिराळ्या कमेंटही करत आहेत.
एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, माकडाचा हा व्हिडिओ पाहून मला हसू आवरत नाहीये. तर दुसऱ्या यूजरने लिहिलं, हा व्हिडिओ पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये, की माकडही अशा पद्धतीने पतंग उडवू शकतं. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.