देशातील पतंग महोत्सव आता संपत आले आहेत. अनेकांचे पतंग आणि त्यांच्या स्टोऱ्या देखील आता जमिनीवर येऊ लागल्या आहेत. असे असताना एक माकडाचा व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर जोरात ट्रेंड होऊ लागला आहे. तुम्हाला माकडाच्या हाती कोलीत, म्हणीचा अर्थ माहिती असेल, परंतू हा व्हिडीओ पाहून ती म्हणही खोटी ठरल्यासारखे वाटेल.
माकड हा मानवाचा पूर्वज होता असे म्हणतात. हेच माकड मर्कटलिला करताना मानवाच्या कृत्यांचे अनेकदा अनुकरण करतात. यावेळी एका माकडाने मकर संक्रांतीला चक्क इमारतीच्या गच्चीवरून पतंग उडविला आहे. इन्स्टावरील sad_status_songs वर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
एक माकड छतावर चढून पतंग उडवताना दिसत आहे. माणसाप्रमाणेच माकड हातात दोर घेऊन पतंग ओढताना दिसत आहे. जणू काही तो आकाशात उडणाऱ्या इतर पतंगांचे दोर कापण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे हात वेगाने फिरवत आहे. यावेळी बाहेर उपस्थित लोक पतंग उडवणाऱ्या माकडाकडे पाहून हसताना, आनंद घेतानाचा आवाज येत आहे.
व्हिडिओला 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ राजस्थानच्या जयपूरचा आहे. पहा हा व्हिडीओ...