एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगी आणि माकड मोबाइलवरून एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. लहान मुलगी आणि माकडाचा (Monkey) हा व्हिडिओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरणार नाही. एकीकडे हा प्राणी आपल्यासाठी धोकादायक ठरू शकेल, अशी पुसटशी जाणीव या लहान मुलीला नाही, तर दुसरीकडे माकड या लहान मुलीला काहीही त्रास देताना दिसत नाही. हे दोघं एकमेकांशी केवळ मोबाइलवरून (Mobile) भांडताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ jagadeeshmadinenimadineni या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Video) शेअर केला गेला आहे. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी घराबाहेर एका कॉटवर बसलेली दिसत आहे. तिच्या हातात मोबाइल फोन असून, ती त्याच्याशी खेळत आहे. याचदरम्यान अचानक एक माकड त्या ठिकाणी येतं आणि त्या लहान मुलीच्या हातातला फोन हिसकावून घेऊन फोनकडे पाहू लागतं; पण ती लहान मुलगीदेखील काही कमी नव्हती. आपली वस्तू दुसऱ्याच्या हातात गेलेली पाहताच ती त्याच्या हातातून फोन ओढून घेते. हे पाहून माकड पुन्हा फोन हिसकावून घेतं. जणू काही हे माकड त्या लहान मुलीला 'जास्त काळ फोन पाहणं वाईट आहे,' अशी शिकवण देत आहे, असं दिसतं.
हा व्हिडिओ जो कोणी पाहतो, त्या व्यक्तीला क्षणभर का होईना पण हसू आवरत नाही. या व्हिडिओला इन्स्टाग्रामव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरही (Platforms) पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. १ लाख ३७ हजारांपेक्षा अधिक लाइक्स (Like) या व्हिडिओला मिळाले आहेत. या व्हिडिओवर कमेंट्सचा (Comments) अक्षरशः पाऊस पडत आहे. अनेक लोकांनी हा व्हिडिओ मजेदार आणि सुंदर असल्याचं म्हटलं आहे. एका युझरने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे, की `फोन मुलांसाठी नाही, असा संदेश हे माकड देत आहे.`