आई ही आईच असते. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. असंच एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. मॅरेथॉनमध्ये धावण्याच अनेकांच स्वप्न असतं. एका आईने आपल्या ६ महिन्याच्या मुलासह मॅरेथॉन स्पर्धा धावल्याच प्रकरण समोर आलं आहे. या महिलेच सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
तुम्हाला ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटेल पण या महिलेने हा पराक्रम केला आहे. ६ महिन्यांच्या बाळाला प्रॅममध्ये बसवून ती १३ किलोमीटरची मॅरेथॉन धावण्यासाठी पोहोचली. जेव्हा लोकांनी तिला पाहिले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांना अगोदर थोडे विचित्र वाटले, पण नंतर त्यांनी आईला पाठिंबा दिला आणि तिला शर्यत पूर्ण करण्यास मदत केली.
VIDEO: चालू सामन्यात मैदानात शिरला अन् गर्लफ्रेंडला प्रपोज केले; मग झाली अशी अवस्था...
महिलेचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान असून ही मॅरेथॉन चीनच्या हुबेई प्रांतात आयोजित करण्यात आली होती. ६ एप्रिल रोजी झालेल्या या शर्यतीत लिऊ आडनाव असलेली एक महिला आपल्या ६ महिन्यांच्या बाळासह स्ट्रॉलरमध्ये पोहोचली. या महिलेला या फिटनेस आणि खेळामध्ये खूप रस आहे, पण ती पहिल्यांदाच मुलासह शर्यतीत आली होती. ती तिच्या मुलाला स्ट्रोलरमध्ये व्यायामधून घेऊन येते आणि फिरते, त्यामुळे तिला याची सवय झाली आहे.
महिलेने बाळाचे स्ट्रॉलर चालवत शर्यत सुरू केली. तिला ३ तासांच्या अंतराने आपल्या मुलाला दोनदा दूध पाजावे लागले, त्यामुळे ती नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा पोहोचली. लोक एकत्र धावत होते आणि आयोजकांनीही तिला मदत केली, तर ती जिथे गेली तिथे लोकांनी तिला प्रोत्साहन दिले. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि नेटकऱ्यांनी आईचे खूप कौतुक केले.