आपली नेहमीची दिनचर्या सुरळीत होण्यासाठी लहान मुलांना आईवडिल टाईमटेबल बनवून देतात. लहान मुलाने त्या टाईमटेबलप्रमाणे वागावं अशी त्यांची इच्छा असते पण आता असं एक टाईमटेबल व्हायरल होत आहे जे पाहुन तुम्हाला हसु येईल. रेडिट या सोशल साईटवर हे टाईमटेबल व्हायरल होत आहे. या टाईमटेबलमध्ये आईने जे मुलासाठी लिहिलंय ते खरच रंजक आहे.
आपल्या मुलांनी टाईमटेबल योग्यरितीने फॉलो करावं यासाठी आईवडील अनेकदा त्यांना प्रलोभनही देत असतात. एका आईने हे टाईमटेबल तयार करुन मुलासाठी लिहिलंय की त्याचा दिवस ७ वाजता सुरु होतो. म्हणजे ७ वाजता आलार्म वाजतो पण तो ८ वाजेपर्यंत उठु शकतो. त्यानंतर रोजची दिनचर्या म्हणजेच दुध पिणे, फळ खाणे, नाश्ता करणे, अभ्यास करणे, खेळणे, टीव्ही पाहणे, टेनिस खेळणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
आईने पुढे असंही म्हटलंय की ही कामे जर तो कटकट न करता अजिबात मस्ती न करता करेल तर त्याला दिवसाला १० रुपये मिळतील आणि त्याने हेच टाईमटेबल त्याने आठवडाभर पाळलं तर त्याला १०० रुपये मिळतील. आईच्या या प्रलोभनामुळे मुलगा ते टाईमटेबल फॉलो करेल का? तुम्हाला काय वाटतं?