सोन्याचा किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. सोनं कधी स्वस्त होईल आणि कधी महाग होईल याचं काहीही सांगता येत नाही. सोनं काही हजारांनी स्वस्थ झाल्याचं कळताच लोकांची रांग लागते. पण जर सोनं मोफत मिळालं तर काय होईल? याचा विचारही करता येत नाही. होय, असं खरंच घडलंय. आफ्रिकेच्या (Gold Was Found Congo Central Africa) काँगोमध्येही असा प्रकार घडलाय. जेथे ‘सोन्याचा डोंगर’ सापडला आहे.
कॉंगो देशाच्या अनेक भागात सोन्याचे अस्तित्व आहे. सध्या सोशल मीडियावर कॉंगोच्या डोंगरावरून सोने खोदण्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत पत्रकार अहमद अल्गोहबारी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''सोन्यानं भरलेला डोंगर पाहून काँगोच्या ग्रामस्थांना धक्का बसला. मध्य आफ्रिकेच्या कॉंगोमध्ये एक डोंगर सापडला आहे, ज्यामध्ये 60 ते 90 टक्के सोने असल्याचे सांगितले जात आहे.'' थरारक! फॅन नसतानाही बाथरूमधून यायची हवा; तरूणीनं आतला आरसा बाजूला सरकवताच समोर आलं असं काही....
सोनं सापडल्याची माहिती मिळताच हजारो लोकांनी सोनं लुटण्यासाठी तिथे धाव घेतली. सोन्याच्या प्रचंड गर्दीनंतर खाणकाम करण्यास थोडक्यात बंदी घातली होती. सोन्याचे खाण असणे ही सामान्य बाब आहे. सोन्याची लूट करण्यासाठी प्रचंड गर्दी वाढल्यानंतर खाणकाम करण्यास त्वरित बंदी घालण्यात आली आहे, जेणेकरून लोक नोंदणीनंतरच खाणकाम करू शकतील. या व्हिडीओनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे. याला म्हणतात डोकं! पठ्ठ्यानं जुन्या साडीपासून २ मिनिटात बनवली लांबच लांब दोरी; पाहा व्हिडीओ