VIDEO : नोकरी मिळत नसल्याने रेल्वे समोर उडी घेणार होती तरूणी, रिक्षा चालकाने वेळीच वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 01:52 PM2021-09-29T13:52:47+5:302021-09-29T13:53:37+5:30
रेल्वे फाटकावर अनेक गाड्या थांबल्या होत्या. तिथेच एक तरूणी रेल्वेची वाट बघत उभी होती. तिच्या हालचालीवरून रिक्षा चालकाला शंका आली होती.
मध्य प्रदेशमधून एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ एक तरूणी रेल्वे समोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, सुदैवाने एक ऑटोरिक्षा चालक वेळीच तिथे जाऊन तरूणीचा जीव वाचवतो. India.com च्या रिपोर्टनुसार, रेल्वे फाटकासमोर रेल्वे येण्याची वाट पाहणाऱ्या तरूणीने निळ्या रंगाच कुर्ता घातला आहे आणि चेहरा दुपट्टयाने बांधला आहे.
रेल्वे फाटकावर अनेक गाड्या थांबल्या होत्या. तिथेच एक तरूणी रेल्वेची वाट बघत उभी होती. तिच्या हालचालीवरून रिक्षा चालकाला शंका आली होती. तो तिचा व्हिडीओ बनवत होता. तरूणी रेल्वे जवळ येण्याची वाट बघत होती. जशी रेल्वे जवळ आली तरूणी फाटका खालून रेल्वे ट्रॅकवर जाऊन उभी राहिली. अशात रिक्षा चालकाने हुशारी दाखवली आणि तो तरूणीला खेचण्यासाठी धावला.
नौकरी ना मिलने से परेशान युवती सुसाइड के इरादे से पटरी पर खड़ी हो गई. ट्रेन आती देख ऑटो ड्राइवर ने खींचकर बचाई जान. वीडियो हुआ वायरल. ऑटो चालक मोहसिन की सूझबूझ और दिलेरी को सलाम
— Ravish Pal Singh (@ReporterRavish) September 28, 2021
नोट: सुसाइड किसी समस्या का समाधान नहीं! pic.twitter.com/CZscsq1CX7
वह सब तो ठीक है लेकिन यह ऑटो चालक मोहसिन किसी लड़की का वीडियो क्यों बना रहे थे उन्हें कैसे पता चला कि लड़की सुसाइड करने वाली है और यह शुरू से अंत तक वीडियो बनाते रहे
— ankur bhargava |Vaccinated| (@ankurbhargava13) September 28, 2021
Much praise and admiration for the quick response and bravery of this auto driver. This is how we as citizens should be.
— Ankita Sharma IPS (@ankidurg) September 28, 2021
Also, the girl should be counselled so that she doesn’t repeat when no one is around!
आत्म हत्या करना किसी भी परिस्थिति में कायरता की निशानी है। ओटो ड्राइवर को बधाई। परेशान युवती से यही प्रार्थना है वह हिम्मत ना हारे। मेहनत करो अवसर अवश्य मिलेगा।
— अनिल बेलवाल (@imAbelwal) September 28, 2021
Mohsin ....Salam dost
— Kirit Patel (@Kirit351976) September 28, 2021
मोहसीन असं या रिक्षा चालकाचं नाव असून त्याला अंदाज आला होता की, तरूणी काहीतरी करणार आहे. त्याने वेळीच तरूणीला रेल्वे फाटकावरून बाजूला केलं. त्याने तिला पकडलं तेव्हा तरूणी रडत रडत सोडण्याची मागणी करत होती. मोहसीन तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. मोहसीने तरूणीचा जीव वाचवला. नंतर काही लोकांनी तरूणीला समजावण्याचा प्रयत्न केला.