MS Dhoni Dance on Gulabi Sharara song, Viral video: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने कोरोना काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तरीही धोनी IPL मध्ये अजूनही खेळताना दिसत आहे. IPL वगळता वर्षभर धोनी फारसा चर्चेत नसतो. तो सोशल मीडियावरही फारसा अँक्टीव्ह नसतो. पण निवृत्तीनंतरही त्याचा चाहतावर्ग अद्याप कमी झालेला नाही. उलट धोनीचा साधेपणा आणि त्याचा शांत संयमी स्वभाव दैनंदिन जीवनातही कायम असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे धोनी सार्वजनिक ठिकाणी किंवा एखाद्या पार्टीमध्ये हजर असल्यास चाहते त्याचे फोटो व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या धोनीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 'गुलाबी शरारा' या लोकप्रिय पहाडी गाण्यावर धोनी इतर मित्रमंडळींसोबत ताल धरताना दिसतोय. (Trending on social Media)
चुनरी तेरी चमके नि गुलाबी शरारा हे एक प्रसिद्ध पहाडी गीत आहे. या गीतावर इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर रील व्हायरल होत असतात. तशातच आता महेंद्रसिंग धोनीचे एक रील व्हायरल झाले आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये धोनी आपल्या मित्रमंडळींसोबत एका छोटेखानी पार्टीत आहे. तेथे काही लोक छोटेसे वर्तुळ करून गाण्यावर नाचताना दिसत आहेत. याच लोकांच्यात धोनीदेखील या गाण्यावर नाचताना दिसत आहे.
पाहा धोनीचा व्हायरल व्हिडीओ-
दरम्यान, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी यावर्षीही CSK कडून IPL 2025 मध्ये खेळताना दिसणार आहे. धोनीच्या निवृत्तीला बराच काळ लोटल्याने, IPL च्या नियमानुसार, धोनीला अनकॅप्ड भारतीय खेळाडू म्हणून CSK संघाने रिटेन केले आहे. त्यामुळे यंदा धोनी ४ कोटी रुपयांच्या मानधनासह चेन्नईच्या संघात दिसणार आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही तो केवळ यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात दिसेल अशी अपेक्षा आहे. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच असेल.