Mulayam Singh Yadav Death, Dharmendra Yadav Gets Emotional Video: समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव आज पंचत्त्वात विलीन झाले. माजी संरक्षण मंत्री आणि युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यांच्यावर इटावा येथील सैफई येथील मेला मैदानावर अंत्यसंस्कार पार पडले. मुलायम यांचा मुलगा आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांनी त्यांना मुखाग्नि दिला. समाजवादी पक्षाचे (एसपी) संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी वयाच्या ८२ व्या वर्षी गुरुग्राममधील खासगी मेदांता रुग्णालयात निधन झाले. सोमवारी संध्याकाळी त्यांचे पार्थिव सैफई येथे आणण्यात आले आणि त्यांच्या 'कोठी'त ठेवण्यात आले, जिथे हजारो लोक 'नेताजीं'च्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले. मुलायमसिंह यादव हे त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये 'नेताजी' म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा शेवटचा निरोप देताना त्यांचे जुने सहकारी धर्मेंद्र यादव यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले. ते मुलायम सिंहांच्या पार्थिवाजवळ ढसाढसा रडताना दिसले.
धर्मेंद्र यादवांना अश्रू अनावर
मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवाच्या जवळ उभे असलेले समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. तो ढसाढसा रडायला लागला. त्यांचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुलायम सिंह यांचे पार्थिव सैफईमध्ये ठेवण्यात आले होते. त्याआधी मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यांच्यावर उपचार होत असतानाही धर्मेंद्र यादव बरेचदा तेथे दिसले होते. पण आज मुलायम सिंहांना शेवटचा निरोप देत असताना धर्मेंद्र यादवांना अश्रूंचा बांध फुटला.
--
धर्मेंद्र यादव हे मुलायम यांचे भाऊ अभयराम यादव यांचे पुत्र आणि माजी खासदार आहेत. मेदांता हॉस्पिटलमध्ये धर्मेंद्रही मुलायम सिंह यांच्यासोबत होते. ज्या रुग्णवाहिकेतून मुलायम यांना सैफईला आणण्यात आले, त्या रुग्णवाहिकेत धर्मेंद्रही समोर बसले होते. सैफईत उतरताच ते लहान मुलासारखा रडू लागले. अंत्यसंस्काराच्या दिवशी त्यांचे अश्रू थांबतच नव्हते.