मेहनत करून, गरिबीतून वर येत शिक्षण घेत असलेल्या अनेक होतकरू मुलांच्या कहाण्या तुम्ही याआधी ऐकल्या असतील. आज आम्ही तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर चहा विकून घर चालवत असलेल्या एका १४ वर्षीय मुलाच्या संघर्षाबद्दल सांगणार आहोत. या चिमुरड्याचे नाव शुभन आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसारात लॉकडाऊन झाल्यानंतर त्याच्या आईला काम मिळणं पूर्णपणे बंद झालं. अशा कठीण परिस्थिती घर चालवण्यासाठी पोरानं घराची संपूर्ण जबाबदारी घेतली. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून शुभनची कहाणी व्हायरल होत आहे. लोकांनी शुभनसाठी मदतीचा हात दिला आहे. तर काहींनी शुभनच्या जिद्दीला सलाम केलं आहे.
वृत्तसंस्था एनएनआयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. १४ वर्षीय शुभन आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी चहा विकण्याचे काम करत आहे. कोरोनामुळे त्यांच्या आईची नोकरी गेली. शाळेच्या बसची अटेंडंट म्हणून शुभनची आई काम करत होती. पण लॉकडाऊन असल्यामुळे शाळा आणि शाळेच्या बस पूर्णपणे बंद होत्या म्हणून रोजगार मिळणंही बंद झालं. ७ महिन्यांपासून लांब होतं लेकरू; बापानं ३७ तास स्कूटर चालवून चिमुरड्यासाठी गाव गाठलं
१२ वर्षांपूर्वी शुभनच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आईच्या कमाईनेच घर चालत होतं. शुभनची बहिण सध्या लॉनलाईन क्लासेसच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा अभ्यासाला करायला सुरू करणाार असल्याचे शुभनने सांगितले. नागपाडा, भेंडी बाजारातील एका दुकानात चहा बनवून नागपाडा आणि इतर परिसरात शुभन चहा विकतो. दिवसभरातून ३०० ते ४०० रुपये कमवून आईकडे देत असल्याचे ही सुभानने सांगितले. सोशल मीडिया युजर्सनी शुभनचे कौतुक केले आहे तर अनेकांनी मदतीचे आवाहन केलं आहे. मानलं गड्या! पार्ट टाईम जॉब म्हणून मास्तरानं सुरू केली शेती अन् आता घेतोय १ कोटींची कमाई