देशात कोरोना लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील काही राज्यांमध्ये कोरोना संक्रमणाच्या केसेस अधिकाधिक वाढताना दिसत आहेत. दरम्यान कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकार एक्शन मोडमध्ये असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रसाराबाबत लोकांमध्ये जागृती पसरवण्यासाठी बिझनेसमन आनंद महिंद्रा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, असे जुगाड खरोखरच भारतातच पाहायला मिळू शकतात.
आनंद महिंद्रांनी शुक्रवारी हा फोटो शेअर केला होता. या फोटोत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जेव्हा मुंबईमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ होते आणि लोक जुगाड करायला सुरूवात करतात. उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत मुंबईमध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रकरणांची कारणं सांगितली आहेत. कोरोनातून जीव वाचला म्हणून भाविकाने तिरूपती बालाजी मंदिराला दिलं साडे तीन किलोचं सोनं दान
गेल्या २४ तासात मुंबईत १ हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रसार वाढण्यापासून रोखण्यासाठी दोन फुटांचे अंतर ठेवायला हवे, सॅनिटायजरचा वापर करायला हवा. याशिवाय लसीकरणास सुरूवात झाल्यामुळे निष्काळजीपणा करू नये. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करायला हवे. क्या बात! केवळ १०० रूपयात बदललं महिलेचं नशीब, रातोरात बनली कोट्याधीश...