शहरं
Join us  
Trending Stories
1
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
2
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
3
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
5
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
6
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
7
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
8
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
9
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
10
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
11
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
12
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
13
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
14
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
15
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
16
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
17
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
18
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
19
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
20
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

बुलाती हैं मगर जाने का नहीं! डेटिंग ॲपवरुन तरुणी बोलवतात अन्...; मुंबईतील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 3:50 PM

मुंबईतील अंधेरी येथील नामांकित क्लबमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

mumbai dating scam : भारतात डेटिंग ॲपची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, यामाध्यमातून अनेकांची फसवणूक देखील होत आहे. अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेटिंग ॲपच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले. महिला या ॲपच्या माध्यमातून पुरुषांना एका क्लबमध्ये बोलवतात आणि महागडे पदार्थ आणि दारूची ऑर्डर देतात. तसेच याचे बिल पुरुषांना देण्यास भाग पाडले जाते. भेट झाल्यानंतर नंतर क्लबकडून संबंधित महिला २० टक्के कमिशन देखील घेतात. पण, डेटवर येत असलेल्या पुरुषांना याची काहीच कल्पना नसते अन् ते जाळ्यात अडकतात. मुंबईतील अंधेरी येथील 'द गॉडफादर क्लब'मधून एक प्रकरण समोर आले. अनेक पुरुषांना आपल्या जाळ्यात फसवणूक संबंधित महिलांनी पैसे उकळण्याचे काम केले.

पत्रकार दीपिका भारद्वाज यांनी संबंधित घटना उघडकीस आणली. डेटिंग ॲपवरील महिला पुरुषांना भेटायला बोलवतात आणि क्लबमध्ये घेऊन जातात. तसेच मेन्यूमध्ये उल्लेख नसलेल्या गोष्टींची मागणी करतात. काही वेळ त्यांच्यासोबत घालवल्यानंतर अचानक तिथून पळ काढतात. सर्व बिल पुरूषांना भरावा लागतो, ज्याची किंमत २३,००० ते ६१,००० रूपयांच्या घरात असते. 

दरम्यान, या कटात सहभागी असलेल्या महिला पुरुषांनी भरलेल्या बिलामधून १५ ते २० टक्के कमिशन घेतात. संबंधित क्लबमध्ये दररोज कमीत कमी १० पुरुष येत असतात. अनेकांनी पोलिसांत याची तक्रार केली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी संबंधित क्लबला सूचना दिली आहे आणि प्रकरणाची चौकशी केली जात आहे.  माहितीनुसार, मुंबईतील इतरही काही क्लबमध्ये हा प्रकार चालतो. याप्रकारे अनेकांची फसवणूक केली जाते. डेटिंग ॲपच्या माध्यमातून अशा प्रकारच्या महिलांची टोळी पुरुषांची आर्थिक फसवणूक करते. अशा क्लबमध्ये पीआर कर्मचारी म्हणून महिलांची भर्ती केली जाते. मग या महिला Tinder, Bumble यांमाध्यमातून पुरुषांना क्बलमध्ये बोलवतात आणि धोका देतात. 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला