Social Viral : सोशल मीडियावर रेल्वे अपघाताचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही लोक काही ऐकत नाही. रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचा वापर करा, रेल्वे रूळ ओलांडू नका अशा सूचना रेल्वे स्थानकावर प्रवाशांना वारंवार देण्यात येतात, मात्र त्याचे गांभीर्य लक्षात न घेता प्रवासी दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबईतील माहिम रेल्वे स्थानक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे रेल्वे रुळाच्या शेजारी चुल पेटवून जेवण बनवणाऱ्या महिलांचा व्हायरल होणारा एक व्हिडीओ. सोशल मीडियावर माहिम जंक्शन रेल्वे स्थानकाजवळील एक व्हिडीओ लक्षवेधी ठरतोय. या व्हायरल व्हिडीओवर फक्त नेटकऱ्यांनीच नाहीतर मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये माहिम जंक्शन रेल्वे स्थानकाच्या अगदी जवळच असलेल्या ठिकाणी काही महिला जेवण बनवताना दिसत आहेत. त्याव्यतिरिक्त काही लहान मुलं सैरा-वैरा रेल्वे रुळांवरून धावताना दिसत आहेत. काही जण तर बिनधास्तपणे रेल्वे रुळाच्या बाजुला झोपलेले दिसतायत
या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने या व्हिडीओची तातडीने दखल घेत संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. व्हायरल झालेला व्हिडिओ २४ जानेवारीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ जवळपास १८ हजार वेळा पाहिला गेला आहे आणि 'माहीम जंक्शन येथे रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान' असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.
येथे पाहा :