कोरोना व्हायरसवरून सोशल मीडियात मीम्स तर अनेक व्हायरल झालेत. पण मुंबई पोलिसांनी जे मीम शेअर केलं ते सर्वांना रिलेट करेल. एकप्रकारचे हे मीम कोरोना व्हायरसबाबत अॅडव्हायजरी आहे. जेणेकरून लोक एकत्र येऊ नये किंवा लोकांमध्ये अंतर रहावं. कारण राज्यात कोरोना पीडितांची संख्या वाढत आहे. म्हणूनच लोकांना मुंबई पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केलाय 'बुलाती है मगर जानेका नहीं'.
हे ट्विट मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केलं आहे. यात प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचा फोटोही वापरला आहे. ज्यात ते मास्क लावून आहेत. याला कॅप्शन दिलंय, 'जो व्हायरस है वो फैलाने का नहीं.या गमतीदार ट्विटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना लोकांना हे सांगायचं आहे की, व्हायरसचा प्रभाव वाढू नये म्हणून बाहेर जाऊ नका. म्हणजे घरात रहा आणि सुरक्षित रहा.
प्रसिद्ध शायर राहत इंदौरी साहेबांची ही गझल आहे.
'बुलाती है मगर जाने का नईंये दुनिया है इधर जाने का नईं
मेरे बेटे किसी से इश्क़ करमगर हद से गुजर जाने का नईं
सितारें नोच कर ले जाऊँगामैं खाली हाथ घर जाने का नईं
वबा फैली हुई है हर तरफअभी माहौल मर जाने का नईं
वो गर्दन नापता है नाप लेमगर जालिम से डर जाने का नईं
लोकांना मुंबई पोलिसांचा हा क्रिएटीव्ह अंदाज फारच आवडला. आता राज्यात कोरोनाच्या 44 केसेस झाल्या आहेत. तर देशभरात 172 रूग्ण झाले आहेत. अशात लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.