सोमवारी ग्रिड फेल झाल्यामुळे मुंबईची बत्तीगुल झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर #powecut ट्रेंड व्हायरल होत होता. मुंबईला 24 तास वीजपुरवठा मिळतो. कामाच्या ठिकाणी, घरात लाईट नसली की खूप असवस्थ व्हायला होतं. कधीतरी लाईट गेली तर सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला आपणं सहज नाव ठेवतो. पण वीजपुरवठा करणारे कर्मचारी मात्र नागरिकांना 24 तास वीजपुरवठा कसा होईल, याकडे लक्ष देत असतात. याचे उत्तम उदाहरण सांगणारा व्हिडीओ महाराष्ट्र परिचय केंद्र, दिल्ली येथे उपसंचालक पदावर कार्यरत दयानंद कांबळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्ही लाईट गेल्यानंतर संबंधित यंत्रणेला उलट सुलट बोलण्याआधी नक्की विचार कराल. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. लाईट गेल्यानंतर तक्रारी करण्याआधी मी आधी या कर्मचारीवर्गाबाबत विचार करेन आणि त्यांच्या साठी प्रार्थना करेन. असं त्यांनी म्हटलं आहे.
दयानंद कांबळे यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, सोमवारी संपूर्ण शहराची लाईट गेली होती. ज्याचे कारण खंडाळा घाटातील विजेच्या तारांमधील समस्या होतं. एक मोठा ब्रेकडाऊन झाल्यामुळे लाईट्स गेल्या. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड (MSEB) चार तासांपेक्षा जास्तवेळ हे काम करत होते. त्यांच्या धाडसाला सलाम असंही ते पुढे म्हणाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ५६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले असून चार हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. बाबो! जिराफानं गवत खाण्यासाठी केला भन्नाट जुगाड, ९० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला व्हिडीओ
उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत कामगारांचे कौतुक केलं आहे. मुंबईला अखंडित वीज पुरवठा करणाऱ्या चार मुख्य वाहिन्यांपैकी एक असलेल्या कळवा-तळेगाव या वीज वाहिनीचा तुटलेला कंडक्टर दुरूस्त करण्यासाठी महापारेषणच्या कर्मचाऱ्यांनी लोणावळ्याच्या दुर्गम आणि अतिखोल भागात वादळ आणि वा-यात जीवावर उदार होऊन काम पूर्ण केले. त्यांच्या कर्तव्याला आणि धाडसाला सलाम असंही ते पुढे म्हणाले आहेत. Video: फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांचा PPE किट गरबा, गरबाप्रेमींनी लावली भन्नाट आयडिया