कालपासून मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं धुमाकुळ घातला आहे. अनके ठिकाणी पाणी शिरलं आहे तर काही ठिकाणी घरं आणि रस्ते संपूर्ण पाण्याखाली गेले. पावसामुळे कोणत्या भागात किती पाणी शिरलं आणि त्याठिकाणी नेमकी स्थिती कशी होती. याचे काही व्हिडीओज तुम्ही पाहू शकता.
मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकातील हा व्हिडीओ आहे. मंगळवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर पाणी भरल्यामुळे प्रवाश्यांवर तासनतास ट्रेनची वाट पाहत उभं राहण्याची वेळ आली.
व्हिडीओनुसार गोरेगाव परिसरातील हे दृश्य आहे. घरात पाणी शिरल्याचं या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला होता.
रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं.
अनेक ठिकाणी दुकानं आणि घरांमध्येही पाणी साचलं होतं.
पार्कींग लॉटही तुडूंब पाण्याने भरले होते.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशारा-यानंतर सतर्कतेचा उपाय म्हणून बुधवारी सकाळीच मुंबईतल्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले होते. शिवाय नागरिकांनी आवश्यता असेल तेव्हा घराबाहेर पडावे, असेही आवाहन करण्यात आले होते.
बुधवारी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार मुंबईत दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. याच काळात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बुधवारी सकाळी वरळी सीफेससह पाणी साचलेल्या ठिकाणी दाखल होत या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी करण्यात आलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला. शिवाय नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावा देखील केला.
हे पण वाचा-
Video : बापरे! गाडीच्या चाकामध्ये अकडला १४ फुट लांब अजगर; पाहा 'कसा' बाहेर काढला
Video : भूकेलेल्या खारूताईचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल; 'याला म्हणतात माणुसकी'
काय सांगता! थेट बैलाला डबलसीट घेऊन प्रवासाला निघाला 'हा' पठ्ठ्या; पाहा व्हायरल व्हिडीओ