ऑटोरिक्षाचं वाढत असलेलं भाडं भारतात प्रवाशांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत असतं. अनेक ऑटोरिक्षा ड्रायव्हर त्यांच्या रिक्षातील मीटरमध्ये काहीतरी गडबड करून मीटर वाढवतात. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जेणेकरून रिक्षा ड्रायव्हरने मीटरमध्ये केलेली गडबड प्रवाशांना समाजावी.
पोलीस विभागाने एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. याचा उद्देश प्रवाशांना फसवणुकीबाबत जागरूक करणं आहे. क्लीपमध्ये एक अधिकारी मीटरमध्ये गडबड केल्याचा संकेत दाखवत आहे. मीटरमधील लास्ट डिजीटनंतर एक लाल लाईट ब्लींक होताना दिसत आहे. त्यांनी सांगितलं की, हा लाल लाईट ब्लींक होत असेल तर हा मीटरमध्ये गडबड केल्याचा संकेत आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी पोस्टमध्ये लिहिलं की, "तुम्हालाही विचार पडलाय का की, ऑटोरिक्षाचं बील वेगाने वाढत आहे? तर फार काही रॉकेट सायन्स नाही. मीटरमध्ये गडबड केली हे ओळखण्याची ही एक छोटी ट्रिक आहे".
तसेच पोलीस विभागाने खराब मीटरची तक्रार करण्यासाठी माहिती दिली आहे. यासाठी तुम्ही संबंधित विभागीय परिवहन कार्यालय (RTO) हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकता. RTO मुंबई सेंट्रल: 9076201010 या च्या माध्यमातून mh01taxicomplaint@gmail.com RTO मुंबई पश्चिम: 9920240202 या mh02.autotaxicomplaint@gmail.com.
पोलिसांनी असंही सांगितलं की, मीटरसोबत छेडछाड करणाऱ्या ऑटो रिक्षावाल्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. लोकांनी पुढे यावं आणि तक्रार करावी.