राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. मुंबईतील काही भागांत पावसाच्या रिमझिम सरीही बरल्याची माहिती आहे. डहाणू तालुक्यात रात्री दीड ते दोन वाजल्यापासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. अशात मग सोशल मीडिया यूजर्सही अॅक्टिव झालेत आणि सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस आला.
मुंबई हवामान विभागाने 9 ते 14 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि 11 डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, वातावरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, अचानक वातावरणात बदल झाला असून पावसाचे ढग राज्यातील अनेक भागात जमा झाले आहेत. विशेषत: मुंबई आणि कोकण भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोलापूरमध्येही पावसाने रिमझिम सडा मारला असून दरम्यानच्या काळात हवामान खात्याने यापूर्वीच पावसाची शक्यता वर्तवली होती.