शहरं
Join us  
Trending Stories
1
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
2
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
3
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
5
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
6
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
7
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
8
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
9
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
10
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
11
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
12
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
13
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

'अति घाई संकटात नेई...'! चालत्या ट्रेनमधून पडलेली महिला रेल्वेखाली जाणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2023 3:35 PM

मुंबईतील महिला रेल्वे कॉन्स्टेबलची कामगिरी पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Viral Video : देशभरात रेल्वे प्रवासात दुर्घटनांचे सत्र कायम आहे. मुंबई लोकलच्या  प्रवासात दरवाजाजवळ उभं असताना, खांबाला धडकून किंवा ट्रेन पकडताना दुर्घटना होत असतात. काहीवेळा प्रवाशांना या अशा दुर्घटनांमध्ये प्राणाला मुकावे लागते, तर काहीवेळा नशीब बलवत्तर असल्यामुळे प्रवाशी बचावतात. अशाच एका रेल्वेमधील घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. 

रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाचा जीव धाडसी महिला कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येते आहे. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही प्रत्यक्षात त्याचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. मुंबईच्या धावपळीच्या प्रवासात अनेकदा प्रवाशी जीव धोक्यात घालून ट्रेन पकडतात. काहींना धावती ट्रेन पकडताना जीव गमवावा लागला आहे. पण यातून रेल्वे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास थांबला नाही. 

सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एका रेल्वे अपघातात थोडक्यात बचावलेल्या माहिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका एक्स यूजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला चालत्या रेल्वेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अती घाई करणे महिलेला चांगलेच महागात पडले. धावती ट्रेन पकडताना अचानक ट्रेनच्या पायरीवरून तिचा पाय घसरतो आणि ही महिला ट्रेनमधून खाली फलाटावर पडते. दरम्यान, या महिलेचे तोंड रेल्वेखाली जाईल इतक्यात क्षणाचाही विलंब न करता रेल्वे स्थानकावर गस्तीला असणाऱ्या महिला कॉन्स्टेबलने मदतीचा हात पुढे केला.  या अपघातग्रस्त महिलेचा कॉन्स्टेबलने पाय धरत तिला बाहेर खेचून काढले. या चित्तथरारक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

येथे पाहा व्हिडीओ :

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाrailwayरेल्वे