घरात एखादं लहान बाळ जन्माला आल्यानंतर ना केवळ त्याच्या आईवडिलांना आनंद होतो तर संपूर्ण कुटुंबात उत्साहाचं वातावरण असतं. बाळाच्या आजी-आजोबाचा आनंदही गगनात मावेनासा होतो. परंतु एका जोडप्यासोबत जे काही झाले ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल. या कुटुंबात बाळाचा जन्म होताच आजी-आजोबानं आनंद व्यक्त करण्याऐवजी स्वत:च्या सूनेवरच संशय घेत नातवाची DNA चाचणी केली.
या जोडप्यातील पतीने हा अजब-गजब किस्सा Reddit वर शेअर केला आहे. त्यात पती सांगतो की, माझे आई वडील माझ्या बायकोला पसंत करत नाहीत. जेव्हा मी आणि माझी गर्लफ्रेंड पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आम्हा दोघांना त्यांचा विरोध होता. परंतु हे प्रकरण इतकं गंभीर नव्हते मात्र आता ते खूप गंभीर झालं आहे. माझी पत्नी गर्भवती राहिल्यानंतरही आई वडिलांनी तिचा स्वीकार केला नाही. माझी बायको म्हणून ते तिला पसंत करत नव्हते.
सासू-सासऱ्याला सून आवडत नव्हती
अमेरिकन व्यक्तीसोबत ही घटना घडली आहे. त्याने सांगितले की, त्याच्या पत्नीचं नाव सोन्या आहे. ती एका रेस्टॉरंटमध्ये काम करते. अनेक प्रयत्न केल्यानंतर मी तिला प्रपोज केले. जेव्हा सोन्याला आईवडिलांची भेट करण्यासाठी घरी नेले. पहिल्याच भेटीत आई वडिलांनी सोन्याला नापसंत केले. माझ्या आई वडिलांना वाटलं की, सोन्या केवळ त्यांच्या मुलाचा वापर ग्रीन कार्डसाठी करत आहे. इतकचं नाही लग्नानंतर आई वडिलांनी दोघांना आशीर्वादही दिले नाहीत. आई-वडिलांच्या परवानगीविना दोघांनी लग्न केले आणि वेगळे राहायला लागले.
नातवाच्या जन्मानंतर आजी-आजोबानं उचललं पाऊल
लग्नाच्या २ वर्षानंतर जेव्हा या जोडप्याने एका मुलाला जन्म दिला. तेव्हा मुलाच्या आई वडिलांना पुन्हा जोडप्याशी संपर्क साधला. याचवेळी मुलाच्या आईने नातवाची डीएनए चाचणी केली. जेणेकरून हा मुलगा त्यांचाच नातू आहे की नाही याची पुष्टी व्हावी. जेव्हा ही गोष्ट मुलाला कळाली तेव्हा त्याने आईला याबाबत विचारणा केली. तेव्हा आईने उत्तर दिलं की, हा मुलगा तुझाच आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी मी नातवाची डीएनए टेस्ट केली. या घटनेने नाराज झालेल्या जोडप्याने त्यांच्या बाळाला भेटण्यापासून आजी-आजोबांना दूर केले. सोशल मीडियात ही घटना व्हायरल होत आहे. नेटिझन्स यात मुलाने आईवडिलांबद्दल घेतलेल्या निर्णयाचं समर्थन करत आहेत.