(Image Credit : NBT)
उत्तर कोरियाने शासक किम जोंग-उन नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये भेटले. दोन्ही नेत्यांमध्ये न्यूक्लिअर डीलबाबत चर्चा झाली. या दोघांच्या भेटी व्यतिरिक्त एका वेगळ्याच विषयाची चर्चा अधिक झाली. सोशल मीडियात या दोघांचा एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोने सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.
किम जोंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यात दोघे दिसत आहेत. पण सोबतच दोघांना एका खांबामागे लपून एक मुलगी बघत असल्याचही दिसत आहे. ही मुलगी लपून बघणारी मुलगी आहे तरी कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. या मुलीला लोक 'क्वीन ऑफ फोटोबॉम्ब' असं म्हटलं जात आहे.
कोण आहे ही मुलगी?
अनेक चर्चा आणि अंदाजांनंतर असं समोर आलं आहे की, किम जोंग-उन एकटेच या दौऱ्यावर आले नव्हते. फोटोमध्ये मागे लपून बघणारी जी मुलगी दिसत आहे. ती किम जोंग-उन यांची बहीण आहे. हीचं नाव आहे किम यो जोंग. या व्हिएतनाममध्ये झालेल्या या संमेलनात हिची चांगलीच चर्चा होती. पण ती फार कमी कॅमेरांमध्ये क्लिक केली गेली. त्यामुळे तिला लोक ओळखूच शकले नाहीत.
याआधीही भावासोबत अनेक दौरे
किम यो जोंग ही उत्तर कोरियामधील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. तिने गेल्यावर्षी दक्षिण कोरियाच्या प्योंगचांगमध्ये विंटर ऑलंम्पिकचं प्रतिनिधित्व केलं होतं. किम जोंग-उन याआधी अनेकदा भाऊ किम जोंग-उनसोबत अनेक दौऱ्यांवर गेली होती. पण तिला फार लाइमलाइटमध्ये राहणे पसंत नाही.