आज नॅशनल हगिंग डे ला सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक माकड दुसऱ्या माकडाला मीठी मारताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ @wwf_uk या ट्विट युजरनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनेकदा शब्दांपेक्षा 'जादूची की छप्पी' म्हणजेच मायेचा स्पर्श खूप काही सांगून जातो. आज #NationalHuggingDay असल्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा शेअर करण्यात आला आहे. गोल्डन मंकी ही माकडांची प्रजात सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
कोरोनाच्या माहामारीमुळे मीठी मारणं तर सोडाच पण हात मिळवणंसुद्धा कठीण झालं आहे. कोरोनाकाळात अनेकांनी प्लास्टीकच्या पडद्यांचा आधार घेत आपल्या प्रियजनांची भेट घेतली आहे. हगिंग कर्टन असं नाव त्याला देण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ज्यांना मीठी मारावीशी वाटते. अशा प्रियजनांना सोशल मीडिया युजर्सनी टॅग केलं आहे.
एकमेकांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी २१ जानेवारीला नॅशनल हगिंग डे साजरा केला जातो. एकमेकांच्या मनातील मतभेद दूर करून गोडवा निर्माण करण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात. एका रिसर्चनुसार, मिठी मारल्याने शरीरातील लव्ह हार्मोन्स ऑक्सीटोसिनचं प्रमाण शरीरात वाढतं. याने रक्तप्रवाह चांगलं होऊन हृदयही निरोगी राहतं. त्यामुळे मिठी मारण्याकडे वाईट दृष्टीकोनातून बघू नये. वाह, भारीच! मासेमाराच्या हाती लागला २ कोटींचा खजिना; व्हेलच्या उलटीनं नशीबच पालटलं ना राव
अनेक वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, एखाद्या स्पेशल व्यक्तीला मिठी मारल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे अर्थातच तणाव कमी होतो आणि व्यक्ती स्मरणशक्तीही वाढते. अभ्यासक सांगतात की, मिठी मारल्याने व्यक्तीचा मूड फ्रेश राहतो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला मिठी मारता तेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन हार्मोन अधिक प्रमाणा रिलीज होतात. याने तुमचा मूड फ्रेश राहण्यास मदत होते. तसेच मिठी मारल्याने व्यक्तीची काम करण्याची क्षमताही वाढते. बाप रे बाप! एका बेडकाची किंमत दीड लाख रूपये, जाणून घ्या काय आहे इतकी किंमत मिळण्याचं कारण....